छत्रपती संभाजीनगरमधील अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये. शनिवारी रात्री १२.३० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात १२ जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय. यामध्ये एका लहान बाळाचे आई-बाबा देखील मृत्यू पावलेत. (Latest Marathi News)
राजीव नगर वसाहतीतील एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती या बसने प्रवास करत होत्या. राजीव नगरमधील एकूण ४ जण दगावलेत. यामध्ये ३ जण गांगुर्डे कुटुंबातील आहेत. झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय ५८ वर्ष) अमोल झुंबर गांगुर्डे (वय १८ वर्षे) आणि सारिका झुंबर गांगुर्डे (वय ४० वर्षे) अशी एकाच कुटूंबातील मृतांची नावे आहेत.
चिमुकल्याचे रडून लाह
समृद्धी महामार्गावरील या अपघातात एका चिमुकल्याच्या आई-वडिलांचाही मृत्यू झालाय. नुकतच या जगात पाऊल ठेवलेल्या बाळाने आजून हे जगही निट पाहिलेले नसताना त्याच्या डोक्यावरून आई वडिलांचं छत्र हरपलंय. आपल्या आई वडिलांच्या मृत्यूने बाळाने टाहो फोडलाय. हृदयद्रावक दृश्यांनी सगळ्यांच्याच डोळ्यांतून आसवं वाहत आहेत.
समृद्धी महामार्गावर वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात एक मिनी बस आणि ट्रकची जोरदार धडक बसली. या धडकेत १२ जणांचा मृत्यू आणि २३ जणांचा मृत्यू झालाय. अपघातात ड्रायव्हर थोडक्यात बचावला आहे.
अपघाताचं कारण काय?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघात स्थळाची पाहणी केली. या अपघाताला आरटीओ जबाबदार असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितले. या अपघाताची चौकशी तर कराच, त्याअगोदर समृद्धी महामार्गावर रात्री जे आरटीओचे अधिकारी कर्मचारी होते त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीये. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं दानवे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या अपघाताबाबत ट्वीट करत म्हटलं की, "समृद्धी महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ झालेला भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हिच प्रार्थना!
समृद्धी महामार्गावर आजवर एकूण ७२९ अपघात झाले आहेत. यात २६२ गंभीर स्वरूपाचे अपघात झालेत. तर ४७ अपघातांच्या घटनेत आजवर १०१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यातून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, या महामार्गावरील सुरक्षेला प्राधान्य देऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने शासनाने योग्य ती पाऊले उचलली पाहिजेत, असं शरद पवार म्हटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.