Samrudhi Mahamarg Accident News: Saamtv
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident: 'समृद्धी'वर अपघातांची मालिका थांबेना! सलग पाचव्या दिवशी भीषण अपघात; ४ जण जखमी

Samrudhi Mahamarg Accident News: आज सलग पाचव्या दिवशीही समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये चार जण जखमी झालेत.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. ७ मे २०२४

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे. आज सलग पाचव्या दिवशीही समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये चार जण जखमी झालेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यातील समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा अपघातांच्या मालिकेमुळे चर्चेत आला आहे. समृद्धी महामार्गावर आज सलग पाचव्या दिवशी भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई कॉरिडॉरल चेनेज क्रमांक 284 वर हा अपघात झाला. चालकाला झोप लागल्याने भरधाव कार अनियंत्रित होऊन साईड बेरियरला धडकली.

या भीषण अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. अपघातातील जखमींवर मेहकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

समृद्धीवर पुन्हा अपघात सत्र...

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघातांची मालिका पाहायला मिळत आहे. काल समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज सलग पाचव्या दिवशी अपघात झाल्याने समृद्धीवरील अपघातांची मालिका कधी थांबणार? असा सवाल उपस्थित होत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची शाळांची दयनीय अवस्था

Health Insurance: आता २४ तास अ‍ॅडमिड होण्याची गरज नाही; केवळ २ तास रूग्णालयात राहूनही मिळणार क्लेम

Maharashtra Politics : तुमचा मालक बाटगा, गळ्यात काँग्रेसचं मंगळसूत्र अन् टिळा शरद पवारांचा; रामदास कदमांचा ठाकरेंवर तिखट वार

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT