Samruddhi Mahamarg Buldhana Truck Accident News Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Samruddhi Mahamarg Accident News: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांचं सत्र थांबता थांबत नाहीये. दिवसागणिक समृद्धी महामार्गावरील अपघाताचं प्रमाण वाढतच चाललं आहे.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही

Samruddhi Mahamarg Accident News: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांचं सत्र थांबता थांबत नाहीये. दिवसागणिक समृद्धी महामार्गावरील अपघाताचं प्रमाण वाढतच चाललं आहे. यातील बहुतांश अपघात अतिवेगाने वाहन चालवल्याने घडत आहेत. तर काही वाहनांचे टायर फुटल्याने देखील अपघाताच्या घटना घडत आहे.

दरम्यान, केमिकल घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. नाशिकहून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या ट्रकचा बुलढाण्याजवळील मेहकरजवळ अचानक समोरील टायर फुटला. त्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन थेट डिव्हायडरला जाऊन धडकला. हा अपघात इतका भीषण होता, की ट्रकला अचानक आग लागली.

या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रकचालक आणि वाहकाने वेळेवर ट्रकबाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

दरम्यान, ट्रकला आग इतकी भीषण होती, दुरपर्यंत आगीचे लोट दिसून येत होते. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील नागरिक महामार्गाच्या दिशेने धावत आले. या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अपघात

छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे येणाऱ्या इंडिगो कारला भीषण अपघात झालाय. यावेळी अपघात ग्रस्त इंडिगो कारने 4 ते 5 पलट्या घेतल्या असून यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना धुळे- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या पाडळसिंगी येथील उड्डाण पुलावर घडली आहे.

तर घटनेची माहिती कळताच महामार्ग टीमचे प्रतीक कदम, बाळासाहेब काटे, महादेव पवार, सुभाष नन्नवरे यांनी घटनास्थळी दाखल होत, जखमींना महामार्ग रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान दोन्ही जखमी व्यक्ती बीडच्या गुंदावडगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain: महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव, भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; थरारक VIDEO

Soft Thepla: मऊ आणि स्वादिष्ट थेपले कसे बनवायचे? सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रिक्स

Ladki Bahin : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतले लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये!

Maharashtra Rain Live News : जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

SCROLL FOR NEXT