Samruddhi Highway Accident Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident: ‘समृद्धी’वर पुन्हा अपघात, पुण्यातील दाम्पत्य ठार; दोन मुले गंभीर जखमी

‘समृद्धी’वर पुन्हा अपघात, पुण्यातील दाम्पत्य ठार; दोन मुले गंभीर जखमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> चेतन व्यास

Samruddhi Mahamarg Accident News: समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg)  पुन्हा एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहीती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुसाट कारच्या स्टेअरिंगवरुन चालकाने नियंत्रण सुटल्याने अनियंत्रीत कार थेट पुलाखालून रस्ता दुभाजकावर धडकली. या अपघातात कारमधील दाम्पत्याचा मृत्यू झाला तर चालक व दोन लहान मुले गंभीर जखमी झाले.

हा अपघात येळाकेळी येथून समोर गेलेल्या समृद्धी महामार्गावर पुलगाव नजीक झाला. या अपघाताची सावंगी पोलिसांनी नोंद घेतली. प्रियरंजनकुमार गोहित (३७) आणि सोनी प्रियरंजन गोहीत (३५) अशी मृतकांची नावे आहे. तर जखमींमध्ये चालक पेंदुकर इंद्रकुमार बैद आणि सान्वी गोहीत (८) व यीक्षीत गोहीत (४) यांचा समावेश असून त्यांच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Latest Marathi News)

प्रियरंजनकुमार गोहित हे मुळचे मधुबिना जिल्हा बिहार येथील रहिवासी आहेत. मात्र, ते पुणे येथे नोकरी करत होते. आज ते नागपूर येथून कारने मुंबईकडे जात होते. चालक पेंदुकर बैद याला झोपेची डुलकी लागल्याने त्याचे वेगात असलेल्या कारच्या स्टेअरिंगवरुन नियंत्रण सुटले आणि कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. यात कारमधील पाचही जण गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ सावंगी येथील रुग्णालयात नेले असता दोघांचा मृत्यू झाला आहे. (Accident News)

शनिवार आणि रविवार सलग दोन अपघात

तत्पूर्वी शनिवारी या महामार्गावर कारला भीषण अपघात (Car Accident) होऊन चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. तर रविवारीही अनियंत्रित कार दुभाजकावर धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर रविवारी अनियंत्रित कार दुभाजकावर धडकली. येळाकेळी शिवारात हा अपघात झाला. या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या कारमधील पाच जणांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, महाराष्ट्रातील ४४ पक्षांचा समावेश

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही गोपीचंद पडळकर वक्तव्यावर ठाम, म्हणाले - 'माफी मागायचा विषयच नाही'

Maharashtra Live News Update: राजापूर येथे बस थांबवून विद्यार्थांचं आंदोलन

Ajit Pawar: दोन्ही बंधू एकत्र आले तर....; उद्धव आणि राज ठाकरेंवर अजित पवारांचं मोठं विधान

डॉक्टरच्या बायकोला जाळ्यात अडकवलं; प्रायव्हेट व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, लाखो पैसे लुबाडले, अखेर..

SCROLL FOR NEXT