Samruddhi Highway Accident Yandex
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक; १ ठार २ जखमी, वाशिममधील घटना

Truck Hits Container In Washim: समृद्धी महामार्गावर ट्रकने कंटेनरला धडक दिली आहे. यात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Rohini Gudaghe

मनोज जयस्वाल, साम टीव्ही वाशिम

समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली (Samruddhi Highway Accident) आहे. या अपघातामध्ये कंटेनर चक्काचूर झाला आहे. तर ट्रकच्या धडकेत एक ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले आहे. अपघाताच्या घटनांमुळे समृद्धी महामार्गावर नेहमीच चर्चेत आहे. अद्यापही या महामार्गावरील अपघाताचं सत्र संपत नाहीये.

पुन्हा एका भरधाव ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू या महामार्गावर (Truck Hits Container) झाला आहे. समृद्धी महामार्गावर ट्रकने धडक देत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा भीषण अपघात वाशिमच्या कारंजाजवळ लोकेशन 181 वर घडला आहे. यात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ट्रकच्या भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याचं समोर येत आहे.

कंटेनरचा ड्रायव्हर आणि क्लीनर कंटेनरच्या टायरमध्ये हवा चेक करण्यासाठी खाली उतरले होते. ते दोघेही रस्त्यावर (Samruddhi Highway) उभे होते. तेवढ्यात मागच्या बाजुने एक भरधाव ट्रक आला. या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत एक जण जागीच ठार झाला तर गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये ट्रकचालक सुध्दा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

ट्रकचालक बराच वेळ वाहनात अडकून पडला (Accident News) होता. त्याला शर्थीच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आलं आहे. बाहेर काढल्यानंतर ट्रक चालकाला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आलं होतं.अपघाताची माहिती मिळताच पायलट ठाकरे आणि डॉ. वाट घटनास्थळी पोहचले. दोन्ही गंभीर रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. हायवे पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी उपस्थित आहेत. अपघाताची पुढील चौकशी (Washim News) केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Missing Link Project : मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार; 'मिसिंग लिंक' प्रकल्प गेम चेंजर ठरणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Maharashtra Live News Update : शासकीय अधिकारी आणि शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर साजरा केला जल्लोष

Singrauli News: म्हैस चक्क घराच्या छतावर चढली|VIDEO

Beed Crime : बीडमध्ये भयंकर घडलं! उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

SCROLL FOR NEXT