Samruddhi Expressway : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन्ही महानगरांच्या दरम्यानचा प्रवास सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे समृद्धी महामार्ग बांधण्यात आला. या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. राज्यातील सर्वात लांब आणि देशातील सर्वात रुंद ट्विन टनलचे बांधकाम पूर्ण झाले आहे. इगतपुरी आणि ठाणे दरम्यानचा ७६ किमीचा हा शेवटचा टप्पा वाहनांसाठी खुला केल्याने मुंबई ते नागपूर हा प्रवास फक्त ७ ते ८ तासांत पूर्ण करता येईल. डोंगरांच्या मधून हा देशातील सर्वात हायटेक महामार्ग तयार करण्यात आला आहे.
२० मजली इमारतीइतकी उंची
दोन डोंगरांमधील अंतर भरुन काढण्यासाठी २० मजली इमारती इतका उंच व्हायडक्ट ब्रीज बांधण्यात आला. असे एकूण दोन व्हायडक्ट ब्रिज आहेत. एकाची उंची ९१० मीटर तर दुसऱ्या व्हायडक्ट ब्रिजची उंची १२९५ मीटर इतकी आहे. या बोगद्याच्या बांधकामादरम्यान, देशात पहिल्यांदाच हाई प्रेसर वॉटर मिस्ट सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. या सिस्टीममुळे जर बोगद्यात दुर्घटना घडली आणि आग भडकली, तर तापमान ६० डिग्री सेल्सिअयपर्यंत पोहोचताच अग्रिशमन यंत्रणा आपोआप काम करायला सुरुवात करेल. बोगद्यात बसवलेल्या पाईप्समधून पाणी बाहेर पडू लागेल. प्रवास करताना प्रवाशांना इंटरनेटची सुविधा वापरण्यात यावी, सिग्नल/ नेटवर्क मिळावा यासाठी बोगद्याच्या आत लीकी केबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्रांमध्ये इगतपुरीचाs समावेश होते. समृद्धी महामार्ग हा संपूर्ण प्रकल्प १६ पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे. ट्विन टनलचे काम पॅकेज १४ च्या अंतर्गत येते. बोगद्याजवळ नदी असल्याने ते काम पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पावसाळ्यात काम सुरु ठेवण्यासाठी टनलजवळ एक धरण बांधावे लागले. भविष्यात ट्विन टनलमध्ये पाणी भरु नये यासाठी सुरुवातीच्या भागात २०० मीटर लांब शेड टनल बांधण्यात आली आहे. या टनलचे काम अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण झाले आहे.
समृद्धी महामार्ग - राज्यातील सर्वात लांब बोगद्याची वैशिष्ट्ये -
- ७.७८ किमी लांबी
- १७.६ मीटर रुंदी
- ९.१२ मीटर उंची
- दर १५० मीटरवर फोन
- दर ३० मीटरवर स्पीकर
- इंटरनेट - वाहतूक व्यवस्थापन प्रणाली
- २६ एक्झिट सिस्टीम - फायर अलार्म सिस्टीम
- अॅक्सेस कंट्रोल सिस्टीम
- रेडिओ कम्युनिकेशन
- हाई प्रेसर वाटर मिस्ट सिस्टीम
- सीसीटीव्ही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.