Maharera: महारेराचा महत्त्वाचा निर्णय! बिल्डिंगपासून ते पार्किंगपर्यंत सर्व माहिती एकाच प्रमाणपत्रात मिळणार

Maharera New Decision: महारेराने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता महारेरा नोंदणी प्रमाणपत्रातच सर्व प्रकल्पाची माहिती मिळणार आहे. ग्राहकांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता.
Maharera
MahareraSaam Tv
Published On

आता गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा नोंदणी प्रमाणपत्रच प्रकल्पाची मूलभूत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे. यासाठी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या प्रमाणपत्रात आहे प्रकल्प आणि प्रवर्तकाचे नाव, पत्ते या जुन्या माहितीसह प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ ( Project Built up Area) ; इमारतीचे व विंगचे नाव किंवा क्रमांक; प्रकल्पातील निवासयोग्य मजले ( Habitable floors); प्रकल्पातील निवासी, अनिवासी सदनिका,गाळ्यांची संख्या; परवानगी मिळालेल्या मजल्यांची संख्या ; चारचाकी, दुचाकी आणि अभ्यागतांसाठीच्या एकूण पार्किंगची संख्या याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या कुठल्याही तपशीलात काही दुरुस्त्या ( Corrections) झाल्यास , प्रकल्पाला मुदतवाढ ( Extensions) घेतल्यास किंवा प्रकल्पाचे दुसऱ्या विकासकाकडे हस्तांतरण ( Transfer of project) झाल्यास ही समग्र माहितीही उपलब्ध असणार या सुधारित प्रमाणपत्रात असणार आहे.

Maharera
CIDCO Job: सिडकोमध्ये नोकरीची संधी; पगार २ लाख रुपये; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

महारेराचा ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय

गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा प्रमाणपत्र आणि त्यासोबतचे परिशिष्ट वाचले तरी प्रकल्पाबाबतची मूलभूत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे . महारेराने नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना द्यायच्या नोंदणी प्रमाणपत्रात ग्राहकांना प्रकल्पाबाबतची कुठली प्राथमिक माहिती अत्यावश्यक असते, हे लक्षात घेऊन ग्राहककेंद्रीत अमुलाग्र बदल केले आहेत. पूर्वीच्या प्रमाणपत्रात फक्त प्रकल्प आणि प्रवर्तकाचे नाव, पत्ते एका ओळीत दिले जायचे.

आता ही माहिती वाचायला आणि समजायला सोपी जावी यासाठी बुलेट पॉईंट्स मध्ये दिलेली आहे . शिवाय या प्रमाणपत्राच्या परिशिष्टात प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ; इमारतीचे व विंग्सचे नाव किंवा क्रमांक; प्रकल्पातील निवासयोग्य मजले ; प्रकल्पातील निवासी सदनिका आणि अनिवासी गाळ्यांची एकूण संख्या; इमारतीला किती मजल्यांपर्यंत परवानगी मिळालेली आहे त्याचा तपशील दर्शवणारे अत्यंत महत्त्वाचे प्रारंभ प्रमाणपत्र (CC) ; चारचाकी , दुचाकी आणि अभ्यागतांसाठींच्या ( Visitors Parking) एकूण पार्किंगची संख्या हा समग्र तपशील या प्रमाणपत्राच्या परिशिष्टात पहिल्यांदाच असणार आहे.

एवढेच नाही पुढे त्या प्रकल्पाच्या आयुष्यात प्रवर्तकाने प्रकल्पाच्या कुठल्याही बाबीत काही दुरुस्त्या ( Corrections) केल्यास, प्रकल्पाला मुदतवाढ ( Extension ) घेतल्यास किंवा प्रकल्पाचे दुसऱ्या प्रवर्तकाकडे हस्तांतरण ( Project Transfer) केल्यास हा तपशीलही या प्रकल्पाला भविष्यात दिल्या जाणाऱ्या सुधारित प्रमाणपत्रात राहणार आहे.

सर्व प्रवर्तक हे प्रमाणपत्र प्रकल्पस्थळी, प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ठळकपणे प्रदर्शित करीत असतातच. प्रकल्पाच्या नोंदणीक्रमांकाच्या मदतीने प्रकल्पाबाबतची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर शोधताना पहिल्याच पानावर या प्रमाणपत्राची लिंक असते.

याशिवाय प्रकल्पाशी संबंधित सर्व प्राथमिक माहिती क्यूआर कोड मध्ये देऊन सर्व माध्यमांतील जाहिरातींमध्ये प्रकल्पाच्या नोंदणीक्रमांकासोबत छापणे पूर्वीच महारेराने बंधनकारक केलेले आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करूनही प्रकल्पाशी संबंधित प्राथमिक माहिती मिळवता येऊ शकते.

Maharera
Sambhajinagar CIDCO Police : गुटख्याच्या गोडाऊनवर छापा; संभाजीनगर सिडको पोलिसांची कारवाई, १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
बहुतेकजण आयुष्यभराची कमाई गुंतवून घरखरेदी करीत असतात. ही गुंतवणूक सुरक्षित आणि संरक्षित राहावी यासाठी महारेरा सातत्याने प्रयत्नशील आहे. म्हणूनच महारेराने यात येऊ शकणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन प्रकल्पाला नोंदणीक्रमांक देताना त्याची कायदेविषयक, आर्थिक आणि तांत्रिक छाननी करून नोंदणीक्रमांक मंजूर करायला सुरुवात केलेली आहे. शिवाय घरखरेदीदाराला कायदेशीरदृष्ट्या सक्षम करण्याचा भाग म्हणून महारेराने प्रमाणित घर विक्री करार, घराचे नोंदणीपत्र , पार्किंग, आश्वासित सोयी सुविधा याबाबत अपरिवर्तनीय ( non-negotiable) अशा तरतुदी या अनुषंगाने यापूर्वीच जाहीर केलेल्या आहेत. यातून राज्याच्या स्थावर संपदा क्षेत्रात पारदर्शकता निर्माण होण्यासोबतच संबंधितांमध्ये जबाबदेयताही निर्माण व्हावी, असा महारेराचा प्रयत्न आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून घर खरेदीदारांना आणखी मदत व्हावी, मार्गदर्शन मिळावे यासाठी महारेराकडून नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना दिल्या जाणाऱ्या नोंदणी प्रमाणपत्रांवरच प्रकल्पाबाबतच्या प्राथमिक आणि अत्यंत महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख महारेराने करायला सुरुवात केलेली आहे. ज्यात प्रकल्पाचे क्षेत्रफळ, त्यातील इमारत आणि विंग्सची नावे , संबंधित प्रकल्पाला किती मजल्यापर्यंत बांधकामाची परवानगी दिलेली आहे हेही स्पष्ट केलेले असते. अर्थात याबाबत गरज आहे संबंधित गुंतवणूकदाराने अतिशय सजगपणे या बाबी समजावून घेऊन, त्यातील कायदेशीरबाबी तपासून घेऊन सजगपणे व्यवहार करण्याची.
मनोज सौनिक, अध्यक्ष महारेरा

नवीन महारेरा नोंदणी प्रमाणपत्रांची वैशिष्ट्ये

* गृहनिर्माण प्रकल्पाचे व प्रवर्तकाचे नाव, पत्ता , नोंदणीक्रमांक हा तपशील आता वाचायला, समजायला सोपा जावा म्हणून बुलेट पाॅइंटसमध्ये

* प्रकल्पाचे बांधकाम क्षेत्रफळ

* इमारतीचे, विंगचे नाव/ क्रमांक

* प्रकल्पाचे निवासयोग्य ( Habitable floors) मंजूर मजले

* निवासी / अनिवासी इमारती किती

* बांधकाम परवानगी किती मजल्यापर्यंत आहे हे दर्शवणारे प्रमाणपत्र ( CC)

* चारचाकी, दुचाकी, अभ्यागतांसाठी अशी एकूण सर्व पार्किंग किती

Maharera
Actor wins Mhada Lottery: 'एका Artist चं घर...'; या अभिनेत्याला लागली म्हाडा लॉटरी; फॅमिलीसोबत थाटाट केला गृहप्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com