Samruddhi Expressway Accident Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : समृद्धीवर भयंकर अपघात, ठाण्याहून नागपूरला जाताना काळाचा घाला, मायलेकाचा जागीच मृत्यू

Samruddhi Expressway Accident Nagpur News : समृद्धी महामार्गावर रविवारी भीषण अपघात झाला. कंटेनरला कारची मागून धडक बसून आई आणि मुलाचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Alisha Khedekar

  • ासमृद्धी महामार्गावर डुलकी लागल्याने भीषण अपघात

  • कारची कंटेनरला मागून धडक

  • आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Samruddhi Expressway Accident News : समृद्धी महामार्गावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला. वर्धामधील सेलूजवळ कंटेनरला कारने पाठीमागून जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात आई आणि मुलचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वर्धामधील सेलू पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून घटनेचा देखील पंचनामा केला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी जवळच्या रूग्णालयात पाठवले.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कुटुंब नागपूरला कारने निघाले होते. पण समृद्धी महामार्गावर त्यांच्यावर काळाने घाला घातला. अपघाताचे नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कारने समृद्धी महामार्गच्या मिडल लाईन मधील समोर चालत असलेल्या कंटेनरला मागून धडक दिली.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांच्या उपनिरीक्षक दिलीप थाटे प्रकाश चौधरी हे घटनास्थळी दाखल झाले. धडक इतकी भीषण होती की, कारमधील दोघांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर समृद्धी महामार्गवरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी तात्काळ दखल घेत क्रेनच्या सहाय्याने कारला बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. घटनेची नोंद सेलू पोलिसात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

Operation Tiger: 'महिनाभरापूर्वीच ओमराजेंच्या बंडाचं प्लॅनिंग', भावानेच केला मोठा गौप्यस्फोट

Mumbai Crime: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या, तो भोसकत राहिला मुंबईकर बघत राहिले

SCROLL FOR NEXT