Inova car hits divider on Samruddhi Expressway Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Samruddhi Expressway : समृद्धीवर पाहुण्यांच्या कारचा भीषण अपघात, बाप-लेकाचा जागेवरच मृत्यू, कारचा चक्काचूर

Samruddhi Expressway accident father son dead : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून म्यानमार येथील दोन नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. इनोव्हा गाडी डिव्हायडरवर आदळून चक्काचूर झाली. या अपघातात बाप-लेकाचा जागेवरच मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

मनोज जैस्वाल, वाशिम प्रतिनिधी

Washim Samruddhi highway accident details : समृद्धी महामार्गावरून मुंबईहून नागपूरला जाताना भीषण अपघात जाला आहे. यामध्ये बाप अन् मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. म्यानमारहून सहा जण महाराष्ट्रात आले होते, नागपूरला जाताना त्यांच्या महागड्या कारचा भयानक अपघात झाल. मृतामध्ये १० वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. या अपघातात तीन जणांना दुखापत झाली आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Inova car hits divider on Samruddhi Expressway)

वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात म्यानमार येथील 2 विदेशी नागरिकांचा मृत्यू झालाय. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील चॅनल 232 वर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडरला धडकून हा भीषण अपघात झाला आहे. इनोव्हा गाडीतून सहा विदेशी नागरिक होते. यात दोन महिला, तीन पुरुष आणि एक दहा वर्षीय मुलांचा समावेश आहे. हे सहा विदेशी नागरिक मुंबईवरून नागपूरला जात होते. त्यावेळी काळाने घाला घातला.

वाशिममध्ये झालेल्या या भीषण अपघातात 2 विदेशी नागरिक जागीच ठार झाले तर इतर तीन जखमी झाले आहेत. ड्रायव्हरसह एक विदेशी नागरिक सुखरूप आहेत. अपघातात गाडीचा समोरील भाग चक्काचूर झाला होता..दोन्ही मृतदेह वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी आणण्यात आले आहेत. जखमींवरही उपचार सुरू आहेत. अपघातानंतर समृद्धी महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांकडून जखमी प्रवाशांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा OUT; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल भारताची Playing XI

Dhananjay Munde vs Manoj Jarange: धनंजय मुंडेंचा जरांगेंना विरोध की अस्तित्वाचा संघर्ष?

Prem Birhade News : पुण्याच्या कॉलेजचा 'मॉडर्न' जातीयवाद? तरुणाला गमवावी लागली लंडनमधील नोकरी, VIDEO

Mumbai Crime : मुंबईत अनेक घरे; २०० पेक्षा जास्त चेले; बांगलादेशी किन्नरजवळ सापडलं कोट्यवधींचं घबाड

SCROLL FOR NEXT