तरबेज शेख
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महामार्गावरील अपघातांच्या घटनेत मोठी वाढ होताना दिसत आहे. समृद्धी महामार्गावरही अपघातांचं सत्र सुरुच असलयाचं पाहायला मिळत आहे. याच महामार्गावरून इगतपुरीजवळच्या भरवीर बुद्रूक शिवारात एक भीषण अपघात झाला आहे. मुंबईला जाताना नाशिकचे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. (Latest Marathi News)
समृद्धी महामार्गावरून मुंबईला जाताना नाशिकचे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर वाहनाला भीषण अपघात झाला आहे. अजय मिसर हे श्रीरामपूर न्यायालयातून मुंबईला न्यायालयीन कामानिमित्त जाताना इगतपूरच्या भरवीरजवळ भीषण अपघात झाला आहे.
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात ॲड. अजय मिसर यांना दुखापत झाली आहे. अपघातानंतर पोलीस व रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्याने जखमींवर तेथेच प्रथमोपचार देण्यात आले. मिसर यांचा अपघात झाल्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिकमधील खासगी रुग्णालयकडे रवाना करण्यात येणार आहे.
सध्या वकील अजय मिसर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. या अपघातात मिसर यांच्या पायांना आणि चेहऱ्याला दुखापत झाली असून खांद्याला मुका मार लागला आहे. अजय मिसर यांच्यासह सहायक वकिल व वाहनचालक यांचीही प्रकृती स्थिर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, न्यायालयीन कामकाजासाठी सरकारी वकील अजय मिसर, सहायक वकील प्रथमेश शिंगणे हे श्रीरामपूर तालुका न्यायालयात बुधवारी सकाळी गेले होते. त्यावेळी मिसर यांचा ताफा नाशिकमार्गे मुंबईच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून निघाला. त्यावेळी कारमध्ये अजय मिसर, शिंगणे हे प्रवास करत होते.
महामार्गावर चालक सचिन भोईंजकर कार चालवत होते. भरवीर गावाच्या शिवारात कार पोहचली त्यानंतर समृद्धी महामार्गावर एका ट्रकच्या चालकाने अचानक वेग कमी केला. यामुळे भोईंजकर यांना कारच्या वेगावर त्वरित नियंत्रण मिळविणे अवघड झाले. त्यानंतर त्यांची कार ट्रकवर पाठीमागून जाऊन आदळली. यामुळे वकील अजय मिसर यांच्या कारला अपघात झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.