Samruddhi Mahamarg or Nagpur-Mumbai Super Communication Expressway
Samruddhi Mahamarg or Nagpur-Mumbai Super Communication Expressway Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News: समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमाचं स्थळ बदललं; ११ डिसेंबरला मोदींच्या हस्ते 'या' ठिकाणी होणार उद्घाटन

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Latest News: नागपूरमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमाचं स्थळ बदलण्यात आलं आहे. समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) उद्घाटन कार्यक्रमाचा सोहळा आता नागपूरच्या मिहान येथील एम्स रुग्णालयाजवळच्या मैदानात होणार आहे. येत्या ११ डिसेंबर २०२२ ला हा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

यापूर्वी ठरल्यानुसार समृद्धी महामार्गाचा उद्घाटन सोहळा वायफळ टोल प्लाझा येथे होणार होता. मात्र आता हे स्थान बदलण्यात आलं आहे. यानुसार आता मिहान परिसरातील (Nagpur) एम्स रुग्णालयाजवळील मैदानात होणार उद्धाटन सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात ६० हजारपेक्षा जास्त लोकं येणार असल्याने मोठ्या मैदानात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई (Mumbai) ते नागपूर (Nagpur) हा 701.480 किलोमीटर रस्ता आहे. राज्यात समृद्धी महामार्गाच्या (Hindu Hruduay Samrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) उद्घाटनावरुन श्रेयवादाच्या राजकारण सुरु आहे. नागपूर ते वाशिम या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झालं आहे. हा मार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे या दहा जिल्ह्यांतून जातो. तसेच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या 143 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. 

समृध्दी महामार्गाची वैशिष्ट्ये:

1) महाराष्ट्र समृद्धी महामार्ग एकमेव हरित क्षेत्र प्रकल्प आहे.

2) समृद्धी महामार्गावर कमाल गती घाटात प्रतितास शंभर किलोमीटर आणि सपाट रस्त्यावर 150 किलोमीटर आहे.

3) या मार्गावरुन नागपूर ते मुंबई प्रवासी वाहतूक आठ तासात आणि मालवाहतूक 16 तासात शक्य होईल.

4) राज्याच्या पाच महसूल विभागांच्या दहा जिल्ह्यातील 26 तालुक्यांमधील 392 गावांमधून जाणारा हा सहा पदरी महामार्ग आहे.

5) महाराष्ट्रातील दूरवरचे जिल्हे मुंबईतील बंदरातून आणि नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जगभरात व्यापार करू शकतील.

6) नागपूर मधील 'मिहान'शी अनेक जिल्हे या मार्गामुळे जोडले जाणार आहेत.

7) हा प्रकल्प देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या समृद्धीसाठी सिद्ध झाला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

SCROLL FOR NEXT