Sambhajiraje Chhatrapati, Manoj Jarange Patil, Maratha Reservation SAAM TV
महाराष्ट्र

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचे 'एक पाऊल पुढे'; महाराष्ट्रातील लोकसभा, राज्यसभा खासदारांना एकत्र आणणार

Maratha Reservation Latest News : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांनी एकत्र यावे, असे आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.

सूरज सावंत

Sambhajiraje Chhatrapati Apealed on Maratha Reservation :

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी 'एक पाऊल पुढे' टाकलं आहे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांनी एकत्र यावे, असे आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. तर राज्यात ठिकठिकाणी मराठा संघटनांच्या वतीने उपोषण आणि आंदोलने करण्यात आली. मनोज जरांगे यांच्याकडून राज्य सरकारला अल्टिमेटमही देण्यात आलेले आहे. मराठा आरक्षणासाठी आता संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेतला आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यातील लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी एकत्र यावे, असे आवाहन संभाजीराजेंनी केले आहे. ते लवकरच खासदारांची बैठक बोलावणार आहेत. ही बैठक दिल्लीत होणार आहे. तसेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यातील खासदारांनी उचलून धरावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: निवडणूक कर्मचारी मतपेट्या घेऊन मतदान केंद्रावर रवाना, पोलिसांचा चोख बंदोबस्त

Mental Health Tips: मानसिकदृष्ट्या मजबूत कसे राहावे

Kerri Anne Donaldson : केरी ॲन डोनाल्डसन 'गॉट टॅलेंट' स्टारने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर स्वतःला संपवलं, मृत्यूचे नेमके कारण काय?

Deelip Mhaske News : हिंगोलीमध्ये उमेदवारावर जीवघेणा हल्ला

Yugendra Pawar: बारामतीमध्ये मोठी घडामोड, श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांकडून सर्च ऑपरेशन

SCROLL FOR NEXT