Devendra Fadnavis -Eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Politics: भाजपची खेळी! शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवलं; ठाकरेंच्या २ सदस्यांना फोडलं

Sambhajinagar ZP Poll: छत्रपचती संभाजीनगरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने खेळी करत शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवलं. भाजपने ठाकरेंच्या २ सदस्यांना फोडले.

Priya More

Summary -

  • संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आघाडीवर

  • ठाकरे गटाचे दोन सदस्य भाजपच्या बाजूला

  • अविनाश गलांडे अध्यक्ष होण्याची शक्यता

  • शिंदेसेनेला भाजप सत्तेपासून दूर ठेवणार

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची आज निवडणूक होणार आहे. संख्याबळात महायुतीचे पारडे जड असले तरीही भाजप आणि शिवसेना शिंदेच्या नेत्यांकडून आपल्याच पक्षाचा अध्यक्ष व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने खेळी करत शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केला. भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन सदस्य फोडले. त्यामुळे आता भाजपचे अविनाश गलांडे हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपला उद्धव ठाकरे गटाचे वडगाव कोल्हाटीच्या ललिता सुरेश सोनवणे आणि शिऊरचे संजय निकम हे दोन सदस्य फोडण्यात यश आले. हे दोन्ही सदस्य भाजपला पाठिंबा देणार अशी चर्चा आहे. त्यातच अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कोणत्याही सदस्यांनी मतदान करू नये असा व्हीप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी काढला आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीत तटस्थ राहणार आहेत.

या सर्व घडामोडींनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष बसणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे अविनाश गलांडे हे अध्यक्ष होणार आहेत. शिवसेना शिंदे पक्षाला सत्तेपासून भाजप दूर ठेवण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे काही सदस्य सोबत घेऊन भाजप सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

भाजपचे २३ सदस्य आहेत. काँग्रेसचा १ सदस्य भाजपमध्ये दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या ४ सदस्यांचा पाठिंबा असणार आहे. सोबत प्रहारचा १, अपक्ष १ आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे पक्षाचे २ सदस्य भाजपला पाठिंबा देतील असे संख्याबळ जमावण्यात भाजपला यश आल्याचे सांगितले जात आहे.

बहुमतासाठी ३२ संख्या आवश्यक आहे तो आकडा भाजप एकटा पूर्ण करेल आणि शिवसेना शिंदे पक्षाचे २३ सदस्य हे बाजूला राहतील. युतीची सत्ता आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष पद आमच्याकडे असणार आहे. शिवसेना शिंदे पक्षासोबत आमची बैठक झाली मात्र त्यांना अध्यक्षपद पाहिजे होते. आता आम्ही सत्ता स्थापन करणार असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT