Sambhajinagar Zp School Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Zp School : जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नाही; संतप्त पालकांनी रोखला महामार्ग

Sambhajinagar News : एकिकडे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या कमी होत असताना गल्लेबोरगाव येथे मात्र विद्यार्थी संख्या जास्त असतानाही केवळ शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : शाळेत शिक्षक नाही म्हणून थेट राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गल्ली बोरगाव तिथल्या पालकांवर आली आहे. वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्यानं शाळेला ताळे ठोकून तब्बल तासभर धुळे- सोलापूर महामार्ग अडवून पालकांनी आंदोलन केले. 

संभाजीनगर (sambhajinagar) जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेला इंग्रजी, गणित व शारीरिक शिक्षण हे विषय शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत (Zp School) पाचवी ते दहावीपर्यंत ५९५ विद्यार्थी आहेत. तर आठवी ते दहावीपर्यंत २४६ विद्यार्थी आहेत. माध्यमिक शाळेत सात शिक्षकांची पदे मंजूर असताना फक्त शाळेत चार शिक्षक कार्यरत आहेत. तर एका शिक्षकाची प्रतिनियुक्तीवर शिक्षण विभागाने पाठवले आहे. याबाबत पालक व विद्यार्थ्यांकडून रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकाची नियुक्ती व्हावी अशी मागणी वारंवार केली जात आहे. 

महामार्गावरील वाहतूक खोळंबली 

एकिकडे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या कमी होत असताना गल्लेबोरगाव येथे मात्र विद्यार्थी संख्या जास्त असतानाही केवळ शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शाळेला लवकरात लवकर शिक्षक देण्याची मागणी शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. परंतु याकडे शिक्षण विभागाने लक्ष दिले नाही. शेवटी शाळेला टाळे ठोकून रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. या आंदोलनामुळे तासभर वाहतूक खोळंबली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : घरातलं भांडण चव्हाट्यावर; निकालानंतर दादांचे काकांवर आरोप, VIDEO

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

SCROLL FOR NEXT