Sillod vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Sillod vidhan Sabha : अब्दुल सत्तार जिंकणार का? सिल्लोडमध्ये लागली पैज, जिंकणाऱ्यास मिळणार बुलेट

Sambhajinagar News : अब्दुल सत्तार हे सलग चौथ्यांदा या विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीत उभे आहेत. यापूर्वी सलग तीन वेळा त्यांनी सिल्लोड मतदारसंघातून एक हाती विजय मिळवला आहे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत विजय कोणाचा याचे गणित बांधले जात आहे. काहीजण यावर पैज देखील लावत असतात. त्यानुसारच सिल्लोड विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार यांच्या विजयावर दोघांनी पैज लावली आहे. हि पैज पाचशे, हजार किंवा काही रोख रकमेची नसून बुलेटची आहे. यासाठी बॉण्ड पेपर देखील तयार करण्यात आला आहे.   

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार उभे आहेत. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे सलग चौथ्यांदा या विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीत उभे आहेत. यापूर्वी सलग तीन वेळा त्यांनी सिल्लोड मतदारसंघातून एक हाती विजय मिळवला आहे. यावर्षी त्यांच्या समर्थकांना विजयी होतील याची खात्री आहे. मात्र त्या विजयाचं मताधिक्य किती असेल यावरून चर्चा सुरू आहे. त्यावरूनच ही पैज लावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

यंदाच्या निवडणुकीत सत्तार यांचा विजय किती मतांनी होणार? यावरून यांच्या समर्थकांनी पैज लावली आहे. जो पैज जिंकेल त्याला बुलेट मिळणार आहे. ही पैज ५०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर लिहून लावण्यात आली आहे. नदीम शेख आणि अब्दुल कुरेशी या दोन कार्यकर्त्यानी ही पैज लावली आहे. शेख नदीम यांनी अब्दुल सत्तार हे ३० ते ४० हजारांच्या मतांनी निवडून येतील, असा दावा केला आहे. तर अब्दुल कुरेशी यांनी १० ते २० हजार मतांनी विजयी होतील, असा दावा केला आहे. त्यावरून ही बुलेट पैज लागली आहे. 

निवडणूक कठीण 

सत्तार यांच्या समर्थकांकडून विजयाच्या मताधिक्यावर जरी चर्चा सुरू असली तरी यावेळेस अब्दुल सत्तारांसाठी ही निवडणूक कठीण जाणार याची चर्चा मतदारसंघांमध्ये जोरदार सुरू आहे. भाजपमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटात गेलेले सुरेश बनकर हे त्यांचे विरोधी उमेदवार आहेत. त्यातच स्थानिक भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे युतीचे उमेदवार असूनही अब्दुल सत्तार यांना युतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध या प्रचाराच्या काळात दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO EDLI Scheme: तुमचं PF अकाउंट आहे? तुम्हाला मिळतो ७ लाखांचा मोफत विमा; कसं? वाचा सविस्तर

मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस, हजर होण्याचे आदेश, नेमकं कारण काय? VIDEO

Onkar Elephant : नदीत अंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर अमानुष हल्ला, अंगावर सुतळी बॉम्ब फेकले अन्...

Actress Journey: योगा टीचरवर पडली डायरेक्टरची नजर, केलं फिल्ममध्ये कास्ट; आज आहे कोट्यवधीची मालकीण

मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा महत्वाचा व्हिडिओ समोर, कोण अडकणार?

SCROLL FOR NEXT