Sambhajinagar News : 3 तालुक्यांतील 36 शाळांचे मुख्याध्यापक अडचणीत; गुन्हे दाखल होणार, नेमके कारण काय?

Sambhajinagar News : विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने शिक्षक व शाळेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११९ शाळेच्या मुख्याध्यापकांना शिक्षक व कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन प्रणालीवर सादर करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र वारंवार सांगूनही त्यांनी माहिती सादर न केल्याने जवळपास ३६ मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने शिक्षक व शाळेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच अनुषंगाने संभाजीनगर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या कामासाठी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळेच्या व्यवस्थापन, मुख्याध्यापकांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्ह्यातील ११९ पेक्षा अधिक शाळांच्या प्रशासनाने ऑनलाइन माहिती भरण्यास टाळाटाळ केली. याविषयी माहिती जमा करण्यास सुरुवात केल्यानंतर ती संख्या ९० वर पोहोचली. 

Sambhajinagar News
Suniel Shetty Injury : सुनील शेट्टी जखमी; अॅक्शन सीन करताना दुर्घटना, सेटवर नेमकं काय घडलं?

दरम्यान माहिती न देणाऱ्या शाळांवर कारवाईची नोटीस पाठविल्यानंतर ४१ शाळांनी त्यास उत्तर देत बाजू मांडली. मात्र, उर्वरित शाळांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे माहिती सादर न करणाऱ्या तीन तालुक्यांतील ३६ शाळांच्या मुख्याध्यापकांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश माध्यमिक व प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

Sambhajinagar News
Shahapur Vidhan Sabha : मातोश्रीचा आदेश आला तरी माघार नाही; शहापूरमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उपसले बंडाचे हत्यार

सत्तारांच्या १७ शाळांमधील मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल  

जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील ३६ शाळांवरील मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत. यापैकी ३० शाळा मंत्री तथा शिंदे सेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटी आणि प्रगती शिक्षण संस्थेच्या आहेत. दरम्यान सिल्लोड शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्यात सत्तार यांच्या १७ शाळा, तर संभाजीनगर शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापका विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com