Suniel Shetty
Suniel Shetty InjuredSaam Tv

Suniel Shetty Injury : सुनील शेट्टी जखमी; अॅक्शन सीन करताना दुर्घटना, सेटवर नेमकं काय घडलं?

Suniel Shetty Latest News : सुनील शेट्टी शुटिंगदरम्यान जखमी झाल्याची घटना घडली आहे. एका वेब सीरीजच्या शुटिंगदरम्यान शेट्टी जखमी झाले.
Published on

मुंबई : अभिनेता सुनील शेट्टी वेब सीरीज 'हंटर'साठी अॅक्शन सीन करताना जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनील शेट्टी या वेब सीरीजसाठी एक स्टंट करताना जखमी झाला आहे. त्यांच्या बरगड्यांना मोठी जखम झाली आहे. या घटनेबाबत स्वत: सुनील शेट्टीने माहिती दिली आहे.

नेमकं काय घडलं?

सुनील शेट्टी आज गुरुवारी शुटिंगदरम्यान जखमी झाला. मी गंभीर जखमी झालो नाही. मी व्यवस्थित आहे, असं सुनील शेट्टीने सांगितलं. शेट्टी हा चार ते पाच कलाकारांसोबत फाइट सीन करत होता. त्याचवेळी घटना घडली. या फाइट सीनदरम्यान लाकडी वस्तू सुनील शेट्टीच्या बरगड्यांना लागली. यामुळे सुनील शेट्टी जखमी झाला.

Suniel Shetty
Actress Photos: बस्स! नजरेने घायाळ करतात 'या' अभिनेत्री, तरूनाईला लावतात वेड

मीडिया रिपोर्टनुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील शेट्टी जखमी झाला आहे. जखमी किती गंभीर आहे, यासाठी डॉक्टर आणि एक्स-रे मशीन सेटवर आणली. शेट्टीला गंभीर दुखापत झाली आहे. शेट्टी जखमी झाल्यानंतर शुटिंग थांबवण्यात आलं आहे.

Suniel Shetty
Marathi Actress: तरूणांच्या काळजाचा तुकडा या पोरी; पाहताच हृदय जिंकतात

सुनील शेट्टीने म्हटलं की, 'किरकोळ जखम आहे. कोणतीही गंभीर बाब नाही. मी व्यवस्थित आहे. मी शुटिंगसाठी तयार आहे. तुमच्या सर्व काळजी आणि प्रेमासाठी आभारी आहे. वेब सीरीज 'हंटर'च्या सेटवर सुनील शेट्टी जखमी झाला.

दरम्यान, सुनील शेट्टीला आगामी 'वेलकम टू द जंगल' या सिनेमात पहायला मिळेल. या सिनेमात अक्षय कुमार, दिशा पटानी, परेश रावल, जॅकलीन फर्नांडीज, लारा दत्ता, रवीना टंडन, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे पाहायला मिळणार आहे. सुनील शेट्टीचा 'वेलकम टू द जंगल' सिनेमा २० डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Suniel Shetty
Marathi Actress Post : 'दाटलेल्या ढगांना मनसोक्त बरसू द्यावं…' वडील-भावाच्या आठवणीत मराठी अभिनेत्रीच्या अश्रूंचा बांध फुटला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com