Marathwada water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Marathwada water Crisis : उन्हाळ्याची चाहूल लागताच मराठवाड्यात टँकरची मागणी; ४० गावांमधून आले प्रस्ताव

Sambhajinagar News : गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांत २१६ टँकरने पाणी पुरवठा केला. सर्वाधिक १०५ टँकर संभाजीनगर जिल्ह्यात होते

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : फेब्रुवारी महिना सुरु असून आतापासून उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरवात झाली आहे. अर्थात उन्हाळ्याची चाहूल लागताच मराठवाड्यात टँकरची मागणी सुरु झाली आहे. आतापर्यंत जवळपास ४० गाव-वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा करावा; अशी मागणी आल्याची सांगितले जात आहे. मात्र अद्याप एकही टँकर मंजूर झालेले नाही. आगामी काही दिवसात हे टँकर सुरु करावे लागणार आहेत.

मागील वर्षी कमी पावसाळा झाल्यामुळे सर्वत्र भीषण पाण्याची टंचाई जाणवली होती. यामुळे गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत २१६ टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. त्यात सर्वाधिक १०५ टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होते. मात्र यंदाची परिस्थिती वेगळी असून पाऊस चांगला झाल्यामुळे फारसा तुटवडा जाणवणार नाही अशी शक्यता वर्तविली जात आहे. तरी देखील मराठवाड्यातील काही भागात आतापासून टंचाईचा सामना करावा लागत आहे. 

तरीही टँकरसाठी प्रस्ताव 

मागील वर्षी काही जिल्ह्यात जास्त पाऊस, तर काही जिल्ह्यात कमी पाऊस पडला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने मराठवाड्यात पाणीच पाणी झाले होते. या अतिवृष्टीत ३० लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला बसला होता. एकीकडे ही स्थिती असताना दुसऱ्या बाजूला जानेवारीपासूनच अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे टँकरच्या मागणीचे अर्ज येऊ लागले आहेत. 

पाण्यासाठी सुरु झाली भटकंती 

दरम्यान उन्हाचा पारा वाढल्यानंतर टँकर सुरू होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात विभागातील सरासरी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास जात आहे. काही गावांमधून पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT