Bhandara News : प्रसूतीकळा सुरु झाल्याने आणले रुग्णालयात; प्रसूतीपूर्वीच नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा गर्भातील बाळासह मृत्यू

Bhandara Tumsar News : प्रसुतीकळा आल्यानं नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेला सुरवातीला नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, प्रसूतीला वेळ असल्याचे सांगत डॉक्टरांनी घरी परत पाठविले
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: प्रसुतीचे दिवस पूर्ण होत असताना महिलेला प्रसूतीकळा येण्यास सुरवात झाली. यामुळे कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. महिलेवर उपचार करण्यात येत असताना नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा गर्भातील बाळासह मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडाऱ्याच्या तुमसर येथे घडली आहे. दरम्यान उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या आष्टी या गावातील सुनिता दुर्गेश सोयाम (वय २४) असे मृत गर्भवती महिलेचे नाव आहे. सुनीता हिला प्रसुतीकळा आल्यानं नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेला सुरवातीला नाकाडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रसूतीला वेळ असल्याचे सांगत डॉक्टरांनी तिला घरी परत पाठविले. घरी गेल्यानंतर अधिक त्रास जाणवू लागल्याने तिची प्रकृती खाकवली. त्यामुळं कुटुंबीयांनी तिला तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  

Bhandara News
Maharashtra Politics : ठाकरेंना बालेकिल्ल्यात जबरी धक्का, हुकमी एक्का भाजपाच्या वाटेवर

उपचार सुरु केला असतानाच मृत्यू 

तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात सुनीता हिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्यावर उपचार सुरु केले असताना तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गर्भवती महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र तपासणीअंती मृत्यूचे कारण समोर येईल. 

Bhandara News
Jal Jeevan Yojana : जलजीवन योजनेच्या कामाचा बोजवारा; मेहकर, लोणार तालुक्याच्या १५० गावात पाणीटंचाई

लाखांदूर येथे महिनाभरापूर्वी महिलेचा मृत्यू 

महिनाभरापूर्वी भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली या गावातील मेघा बनारसे या महिलेचा प्रसूतीनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया चुकीची केल्यानं तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत रास्तारोको केलं होतं. या प्रकरणी दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com