छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्याची चाहूल लागताच छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात पाण्यासाठी ओरड सुरू झाली आहे. ज्या वसाहतींमध्ये जलवाहिनीने पाणीपुरवठा होत नाही, त्या वसाहतींमध्ये महापालिकेच्या टँकरच्या फेऱ्या ३३० पर्यंत पोहोचल्या आहेत. तर खासगी टँकरच्या फेऱ्यांची संख्या जवळपास ९०० पर्यंत पोहोचली. मार्च सुरू होताच ही संख्या दुपटीने वाढणार हे निश्चित आहे.
उन्हाळा म्हटला म्हणजे पाण्याचे स्रोत आटणे, पाणी पातळी खालावण्याचे चित्र पाहण्यास मिळत असते. परिणामी पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो. यात छत्रपती संभाजीनगर शहरातील काही भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने वर्षभर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असतो. तर आता उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर टँकरच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे संभाजीनगर शहरातील पाण्याची समस्या अधिक बिकट होण्याचे चित्र आहे.
टँकरसाठी नेमले दोन कंत्राटदार
टँकरच्या पाण्यावर अर्ध्या शहराला महिन्याला लाखो रुपये खर्च करावे लागतात. गुंठेवारी भागातील वसाहतींना पाणी देण्यासाठी महापालिकेने दोन कंत्राटदार नेमले आहेत. दोघांचे मिळून ८६ टँकर ३३० फेऱ्या करतात. एका नागरिकाला एक दिवसाआड एक ड्रम पाणी दिले जाते. महिना ३६६ रुपये मनपाकडे नागरिकांना ऍडव्हान्स भरावे लागतात. ८ ते १० नागरिकांचा एक गट करून टँकर पाठविले जाते.
वर्षाकाठी ४० लाख खर्च
संभाजीनगर शहरात वर्षभर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असतो. यासाठी महिन्याकाठी मनपाला टँकरसाठी ४० लाख रुपये मिळतात. तेवढीच रक्कम कंत्राटदारांना द्यावी लागते. तर मार्च सुरू झाल्यावर मनपाच्या टँकरची संख्या वाढते. मे अखेर १०८ टैंकर ४८० फेऱ्या करतात. टँकरसाठी मनपाला रोज तीन एमएलडी पाणी द्यावे लागते. मात्र आतापासूनच टँकरच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.