Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Zp School : धक्कादायक! गणवेश वाटपात शिक्षकाची कमिशन मागणी; ऑडिओ क्लिप व्हायरल

Sambhajinagar News : सरपंचाच्या नावे थेट गणवेश पुरवठादाराकडे १५ हजार रुपये कमिशनची मागणी केल्याचा आरोप समोर आला आहे. याबाबतची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दिला जाणारा मोफत गणवेश म्हणजे शासनाचा सामाजिक न्याय व शैक्षणिक संधीतील समतेचा एक भाग आहे. मात्र या उपक्रमाला भ्रष्टाचाराची लागण झाल्याचे धक्कादायक वास्तव छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आले आहे. पैठण तालुक्यातील मौजे वडजी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने सरपंचाच्या नावे थेट गणवेश पुरवठादाराकडे १५ हजार रुपये कमिशनची मागणी केल्याचा आरोप समोर आला आहे. याबाबतची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठा केला जात असतो. मात्र या गणवेश प्रकरणात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात झालेल्या सदर प्रकरणात संबंधित शिक्षकाने एका शाळेसाठी गणवेश पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्याशी संपर्क साधला. यात प्रत्येक गणवेशामागे ठराविक रक्कम ‘कमिशन’ म्हणून मागितल्याचा उल्लेख या क्लिपमध्ये स्पष्टपणे ऐकू येतो. इतकेच नव्हे तर सरपंचाच्या नावे हे पैसे देण्याची सूचना करत सर्व सहकार्य करतो, पण साईडला पाहिजेच अशा स्वरूपाची भाषा त्यात वापरण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश नाही 
दरम्यान या प्रकारामुळे शैक्षणिक व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाचे उद्दिष्ट असताना त्यात भ्रष्टाचार होत असल्याने या योजनेचा मूळ हेतू हरवत असल्याची प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना अद्याप पूर्ण गणवेशही मिळाले नसताना शिक्षक आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या नावाने पैसे मागितले जात असल्याची चर्चा गावात सुरू झाली आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी 
सदर प्रकरणाची चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करावी; अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या प्रकारामुळे संपूर्ण शिक्षक समाज संतप्त झाला आहे. सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली नाही; तर यापुढे शासकीय योजना राबवताना जनतेचा विश्वास उरणार नाही, अशी नाराजी पालकांमध्ये आहे. शिक्षण विभागाने तातडीने याची दखल घेऊन पारदर्शकता सुनिश्चित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

SCROLL FOR NEXT