Bribe Case : प्रसूती रजा मंजुरीसाठी मागितले ३६ हजार; मुख्याध्यापिकेसह लिपिक ताब्यात

Jalgaon News : रावेर तालुक्यातील जनता शिक्षण मंडळ संचलित धनाजी नाना विद्यालयात सदरचा प्रकार घडला आहे. यात मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन आणि कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील यांना एसीबीने ताब्यात घेतले
Bribe Case
Bribe CaseSaam tv
Published On

सावदा (जळगाव) : शाळेतील कर्मचारी महिलेने प्रसूतीसाठी रजा टाकलेली होती. दरम्यान प्रसूती रजा मजूर करण्यासाठी सदर महिला कर्मचारी शाळेत गेल्यानंतर तिच्याकडे ३६ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. दरम्यान प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिकेसह कनिष्ठ लिपिकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक करण्यात आली आहे.  

रावेर तालुक्यातील खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळ संचलित धनाजी नाना विद्यालयात सदरचा प्रकार घडला आहे. यात मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन आणि कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा महाजन आणि कनिष्ठ लिपिक आशिष पाटील यांच्याकडे शाळेतील कर्मचारी असलेल्या महिलेची प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रासह २ जूनला अर्ज दिला होता. 

Bribe Case
Sindhudurg : मालवण समुद्रात मासेमारी नौका बुडाली; एक मच्छीमार बेपत्ता, दोघे बचावले

प्रतिमहिन्यासाठी ६ हजार रुपयांची मागणी 

दरम्यान तक्रारदारांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिका मनीषा महाजन यांची भेट घेऊन त्यांच्या सुनेच्या प्रसूती रजेच्या अर्जाबाबत विचारणा केली. मात्र त्यांनी प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी प्रतिमहिना ६ हजार रुपयांप्रमाणे सहा महिन्यांच्या रजा मंजुरीसाठी तक्रारदाराकडे ३६ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. 

Bribe Case
Saam Impact : दोन पुलांच्या उभारणीसह ६ किमीचा रस्ता; साम टीव्हीच्या बातमीनंतर बांधकाम विभागाकडून मोजणी

रक्कम घेताना रंगेहाथ पकडले 

आलेल्या तक्रारीची पडताळणी करत एसीबी पथकाने सापळा रचून कारवाई केली. मुख्याध्यापिका महाजन यांनी लाचेची मागणी केली व तक्रारदाराकडून ३६ रुपये पंचासमक्ष स्वीकारली. तसेच कनिष्ठ लिपिक पाटील लाचेची रक्कम मोजत असताना मुख्याध्यापिका महाजन आणि कनिष्ठ लिपिक पाटील या दोघांना पथकाने पकडले. मुख्याध्यापिका व कनिष्ठ लिपिकाविरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com