Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : धावत्या कारने घेतला पेट; कारमधील ४ जण थोडक्यात बचावले

Sambhajinagar News : कारमध्ये जालना जिल्ह्यातील एका कुटुंबातील चार जण हे पुण्याकडून गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. कार वाळूज येथे आली असता कारच्या समोरील भागातून अचानकपणे धूर निघन्यास सुरवात झाली

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात नवीन शिवराई येथे एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेमध्ये कारमध्ये बसलेले ४ जण थोडक्यात बचावले असून मोठा अनर्थ टळला आहे. यामध्ये कार ही पूर्णपणे जळून खाक झालेली आहे. 

अहमदनगर- छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) मार्गावर मध्य रात्रीच्या सुमारास वाळूज येथे हि घटना घडली आहे. या घटनेतील कारमध्ये जालना जिल्ह्यातील एका कुटुंबातील चार जण हे पुण्याकडून गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. कार वाळूज येथे आली असता कारच्या समोरील भागातून अचानकपणे धूर निघन्यास सुरवात झाली. यामुळे कार चालकाने प्रसंगावधान राखून कार रस्त्याच्या बाजूला घेत थांबवत आपल्या परिवाराला बाहेर काढले. 

पाहता- पाहता काही क्षणात कारने (Fire) पेट घेतला. यात कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. दरम्यान घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळतात अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र तोपर्यंत ही कार पूर्णपणे जळून खाक झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma-Virat Kohli : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्डकप खेळणार का? अजित आगरकर पहिल्यांदाच इतका स्पष्ट बोलला

Saturday Horoscope : धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ कार्य हातून घडणार; ५ राशींच्या लोकांना होणार धनलाभ

Maharashtra Live News Update: वसुबारसच्या निमित्ताने रायगडमध्ये गाय आणि वासराच्या पुजनाला माहिलांची गर्दी

Gajanan Vada Pav Dombivli : चाललंय काय? प्रसिद्ध वडपावच्या दुकानात चटणीत आढळल्या अळ्या; ग्राहकांचा संताप

विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवून गेला, छगन भुजबळांचा विखे पटलांवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT