Gadchiroli Heavy Rain: पर्लकोटा नदीला पूर; २४ तासात भामरागडचा संपर्क पुन्हा तुटला

Gadchiroli Parlkota River Flood: गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे
Gadchiroli Heavy Rain: पर्लकोटा नदीला पूर; २४ तासात भामरागडचा संपर्क पुन्हा तुटला
Gadchiroli Heavy RainSaam TV
Published On

मंगेश भांडेकर 
गडचिरोली
: गेल्या पाच दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान मंगळवारी विश्रांती घेतल्यानंतर पावसाने रात्री जोरदार हजेरी लावली. यामुळे भामरागड शहरालगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढले आहे. त्यामुळे २४ तासात भामरागडचा पुन्हा संपर्क तुटला आहे. 

Gadchiroli Heavy Rain: पर्लकोटा नदीला पूर; २४ तासात भामरागडचा संपर्क पुन्हा तुटला
Wainganga River Flood : वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; कारधा छोट्या पुलावर पाणी आल्याने पुल केला बंद

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान मंगळवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर रात्रीच्या सुमारास पुन्हा पावसाला (Heavy Rain) सुरवात झाली. मंगळवारी पावसाने उसंत घेतल्याने सकाळच्या सुमारास पर्लकोटा नदीचा पूर ओसरल्याने भामरागड- ताडगाव हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला होता. तर गडचिरोली-नागपूर हा मार्गही सायंकाळी सुरू झाला होता. 

Gadchiroli Heavy Rain: पर्लकोटा नदीला पूर; २४ तासात भामरागडचा संपर्क पुन्हा तुटला
Tulja bhavani Mandir Tuljapur: तुळजाभवानी पुजारी मंडळाचाही सशुल्क ऑनलाईन दर्शन पासला विरोध

दिवसभर पावसाच्या विश्रांतीनंतर रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सकाळी परत दोन्ही मार्ग पुन्हा बंद झाले आहेत. त्यातच गोसेखुर्द धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी नदीने पात्र भरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १६ मार्ग बंद झाले आहेत. विशेष म्हणजे आजही गडचिरोली जिल्ह्यात सर्व दूर मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूर परिस्थिती कायम राहणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com