Tulja bhavani Mandir Tuljapur: तुळजाभवानी पुजारी मंडळाचाही सशुल्क ऑनलाईन दर्शन पासला विरोध

Update on Dharashiv's Tulja Bhavani Mandir Online Darshan Pass: तुळजाभवानी मंदीर संस्थांनने भाविकांच्या सुविधेसाठी ऑनलाईन सशुल्क पासची सुविधा सुरु केली आहे. मंदिर प्रशासनाने यासाठी मोबाईल अँप तयार केले
Tuljabhavani Mandir Tuljapur: तुळजाभवानी पुजारी मंडळाचाही सशुल्क ऑनलाईन दर्शन पासला विरोध
Tuljabhavani MandirSaam TV
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सशुल्क स्पेशल दर्शन पास मोबाईवरुन काढता येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याची सुरवात २२ जुलैपासून झाली आहे. मात्र या दर्शन पासला मंदिरातील पूर्वजारी व तुळजाभवानी पुजारी मंडळाने देखील विरोध केला आहे. 

Tuljabhavani Mandir Tuljapur: तुळजाभवानी पुजारी मंडळाचाही सशुल्क ऑनलाईन दर्शन पासला विरोध
Wainganga River Flood : वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; कारधा छोट्या पुलावर पाणी आल्याने पुल केला बंद

तुळजाभवानी मंदीर (Tuljabhavani Mandir) संस्थांनने भाविकांच्या सुविधेसाठी ऑनलाईन सशुल्क पासची सुविधा सुरु केली आहे. मंदिर प्रशासनाने यासाठी मोबाईल अँप तयार केले असुन यासाठी ५०० रुपये देणगी देवुन सशुल्क दर्शन पास ऑनलाईन काढता येणार आहे. मात्र असे असले (Dharashiv News) तरी याला श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने देखील विरोध केला असुन तुळजाभवानी मंदीर संस्थांन केवळ पेड आणि पेडच भक्ताचा विचार करत असल्याचे पुजारी मंडळाचे म्हणणे आहे. 

Tuljabhavani Mandir Tuljapur: तुळजाभवानी पुजारी मंडळाचाही सशुल्क ऑनलाईन दर्शन पासला विरोध
Nandurbar Zp School : जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतीच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचे आंदोलन

ऐकीकडे मोठ्या प्रमाणावर भाविक लाईनमध्ये दर्शन घेतात. त्याचा विचार होणे गरजेचे असुन त्यांना सर्व सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. त्यामुळे गोरगरीब पैसे नाहीत म्हणून लाईनमध्ये ताटकळत उभे राहुन दर्शन घेतात. त्यामुळे आमचा या निर्णयाला विरोध असल्याची भुमीका पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com