Poshan Aahar Saam tv
महाराष्ट्र

Poshan Aahar : शालेय पोषण आहारात आता सोया मिल्क; प्राथमिक अनुदानित, खाजगी शाळांसाठी योजना

Sambhajinagar News : प्राथमिक शाळा, अनुदानित खाजगी प्राथमिक शाळातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली. त्यानंतर आठवीपर्यंत तिचा विस्तारही करण्यात आला

Rajesh Sonwane

रामू ढाकणे

छत्रपती संभाजीनगर : शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जात असतो. या पोषण आहारात वेगवेगळे पदार्थ, अन्न (Sambhajinagar) असा पूरक आहार दिला जात असतो. मात्र येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून (Student) विद्यार्थ्यांना पोषण आहारात सोया मिल्क देखील दिला जाणार आहे. प्राथमिक अनुदानित, खाजगी शाळांसाठी हि योजना आहे. (Breaking Marathi News)

जिल्हा परिषद, महापालिका तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये पोषण आहार (Poshan Aahar) देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आता येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात सुधारणा करून वैविध्यपूर्ण पोषण आहार दिला जाणार आहे. त्यामुळे यंदापासून पूरक आहार सोबत विद्यार्थ्यांना अंडी, केळी, मनुका दिले जात असून येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून सोया मिल्क देखील दिले जाणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटनोंदणीचे व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थातर्फे चालवण्यात येत असलेल्या प्राथमिक शाळा, अनुदानित खाजगी प्राथमिक शाळातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली. त्यानंतर आठवीपर्यंत तिचा विस्तारही करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Saam Exit Poll : सांगलीत भाजप मारणार बाजी? एक्झिट पोलमध्ये कौल कुणाला?

Maharashtra Exit Poll : काँग्रेसचा गड अपक्ष भेदणार? एक्झिट पोलच्या अंदाज काय?

Sachin Shinde : भाजपला धक्का! सचिन शिंदे मशाल हाती घेणार | Marathi News

SCROLL FOR NEXT