Sanjay Shirsat Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Shirsat : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले, पण...; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

Sambhajinagar News : संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना आमदार संजय शिरसाठ यांनी एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या मराठा आरक्षणावर मत मांडले आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र शिंदे साहेबांनी आरक्षण दिले. त्यांच्या निर्णयावर जल्लोष झाला. (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी दिलेले आरक्षण हे ओबीसीला धक्का न लागणारे आहे. मात्र, ओबीसीला धक्का लागेल असे (Sambhajinagar) काहीजण बोलत फिरत आहेत. आनंदाचे वातावरण खराब करण्याचे काम काही जण करत आहेत. त्यांनी आरोप करतांना त्यांनी राजकीय पक्षाचे जोडे दूर ठेवावे; असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी केले आहे. (Latest marathi News)

संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना आमदार संजय शिरसाठ यांनी एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या मराठा आरक्षणावर मत मांडले आहे. तसेच काही लोकांचा रोष असेल तर त्यांनी राजकीय जोडे बाहेर काढावे मग भूमिका घ्यावी. त्यांनी कॅबिनेटमध्ये चर्चा करावी. नाही ऐकले तर त्यांनी त्यांची भूमिका घ्यावी; असे म्हणत छगन भुजबळ (Chagan Bhujabal) यांना टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे राजकीय पुढाऱ्यांनी काय करावं हे त्यांनी बघावं. ओबीसी आरक्षणाला (OBC) धक्का लागणार नाही आणि मुख्यमंत्री सर्व समाजाची एक बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतील असेही त्यांनी सांगितले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगे पाटील यांना लोक पाठींबा देताय 

काही लोक मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करत होते. त्यांना एकनाथ शिंदे यांनी मारलेली चपराक आहे. मनोज जरांगे पाटील हे काय भूमिका घेतात हा त्यांचा प्रश्न आहे. सर्व समाजासाठी भूमिका घेत असतील तर वाईट काय? एखादी भूमिका घेतली लोक पाठिंबा देतात हे त्यांना माहिती आहे. 

इंडिया आघाडी कशी टिकणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इंडिया आघाडी तयार करण्यात आली आहे. परंतु इंडिया आघाडी होणार नाही आणि कळणार नाही. मुळात त्यांच्यात पंतप्रधान पदासाठी चेहरा नाही. ती कशी टिकणार, एक एक करून बाहेर पडत आहेत. 

आंबेडकर आले तर स्वागत 
प्रकाश आंबेडकर बोलतात म्हणजे याचा अर्थ आघाडी नाही. फक्त उबाठा गटाचे लोक म्हणत आहे की आघाडी आहे. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आले काय किंवा आम्ही गेलो काय सारखच आहे. आम्ही त्यांना सोबत येण्याबाबत विनंती केली. ते आले तर स्वागत आहे. चांगलं सरकार देऊ. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

SCROLL FOR NEXT