Pune News : बनावट दारूच्या ६० हजार बाटल्या जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Pune News : जुना मुंबई- पुणे हायवे रोडवर २३ जानेवारीला एक ट्रक मामुरडी गावाजवळ येथून जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.
Pune News
Pune NewsSaam tv
Published On

अक्षय बडवे 
पुणे
: जुन्या मुंबई- पुणे मार्गावर असलेल्या मामुर्डी गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. (Pune) या कारवाईत ६०० बॉक्समध्ये लपवण्यात आलेल्या बनावट मद्याच्या ६० हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ज्याची किंमत २१ लाख रुपये आहे. (Tajya Batmya)

Pune News
Saam Impact : 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर 11 गावांना जोडणारी नंदुरबारमधील बस सेवा सुरु

जुना मुंबई- पुणे हायवे रोडवर २३ जानेवारीला एक ट्रक मामुरडी गावाजवळ येथून जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार सापळा रचून अधिकारी कर्मचाऱ्यांनी तो ट्रक अडवत त्याची तपासणी केली. या ट्रकमध्ये गोवा राज्यात निर्मित बनावट देशी (Liquor) दारू रॉकेट संत्रा ९० मि.ली. क्षमतेच्या ६० हजार बाटल्या (६०० बॉक्स) एवढा मुद्देमाल मिळुन आला आहे. या मुद्देमालाची किंमत तब्बल २१ लाख रुपये इतकी आहे. या गुन्ह्यात १५ लाखाच्या वाहनासह एकूण ३६ लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. 

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune News
Beed Crime News: अंबाजोगाईत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग ; रोडरोमियोने बळजबरीनं कॉफी शॉपमध्ये नेत काढली छेड

कारखान्यावरही टाकला छापा 
जप्त बनावट देशी मद्य हे गोवा राज्यातील वडावल या ठिकाणी एका पत्र्याच्या गोडावूनमध्ये तयार केले जात असून त्याची विक्री महाराष्ट्र राज्यात केली जाते. याची माहिती समजल्याने या पथकामार्फत गोवा राज्यात जाऊन बनावट देशीमद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा घालून बनावट देशी मद्य तयार करण्यासाठी लागणारा १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सीलबंद करण्यात आला. या प्रकरणी झुल्फिकार ताज आली चौधरी व अमित ठाकूर आहेर या दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com