Sambhajinagar Corporation Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाच्यावतीने सध्या ७००, १२०० आणि ९०० मिलिमीटर या तीन योजनेतून शहरात पाणी पुरवठा करण्यात येतो.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात पाणी पुरवठ्यासाठी महापालिका प्रशासन दर महिन्याला कोट्यावधी रुपयांची वीज बिल भरणा करते. या वीज बिलातून सुटका व्हावी व पैसे वाचावा या उद्देशाने संभाजीनगर महापालिका आता पाणी पुरवठा करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करणार आहे. यासाठीचे नियोजन सध्या महापालिकेचे सुरु आहे.  

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) महापालिका प्रशासनाच्यावतीने सध्या ७००, १२०० आणि ९०० मिलिमीटर या तीन योजनेतून शहरात पाणी पुरवठा करण्यात येतो. या जल योजनेसाठी पालिकेला दर महिन्याला अडीच ते तीन कोटी रुपयांचे वीज येत असून ते महावितरणकडे भरणा करावे लागत असते. अनेकदा बिल भरणा न झाल्यास (Mahavitaran) महावितरणकडून नोटीस बजावून वीज पुरवठा खंडित केला जात असतो. दरम्यान महापालिकेच्या नाजूक आर्थिक स्थितीमुळे जास्तीचे बिल भरणा करणे शक्य होणार नाही. म्हणून विज बिल कपातीसाठी प्रशासकांनी हा निर्णय घेतला आहे.

१०० एकर जागेत होणार प्रकल्प 

या सर्व परिस्थितीमुळे लवकरच नवीन जल योजना कार्यान्वित होणार असून त्याचे वीज बिल भरमसाठ प्रमाणात येईल. त्यासाठी महापालिका प्रशासन सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या विचारत आहे. यासाठी जवळपास १०० एकर जागा लागेल; अशी माहिती महापालिका प्रशासकांनी दिली आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT