Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: वाळूज औद्योगिक परिसरात पोलिसांचा कुंटणखान्यावर छापा; लोकवस्तीतील लाॅजिंगवर सुरू होता प्रकार

वाळूज औद्योगिक परिसरात पोलिसांचा कुंटणखान्यावर छापा; लोकवस्तीतील लाॅजिंगवर सुरू होता प्रकार

साम टिव्ही ब्युरो

छत्रपती संभाजीनगर : भरचौकातील नागरी वसाहतीतील लाॅजिंगवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी (Police) छापा टाकून लाॅजिंग मालकासह तीन दलालांना अटक केली आहे. लाॅजिंगवर (Sambhajinagar) केलेली ही कारवाई उद्योगनगरीतील पहिलीच कारवाई आहे. या कारवाईमुळे अनेक लाॅजिंगवाल्याचे धाबे दणाणले आहेत. (Live Marathi News)

वाळुंज शहरातील ओमसाई लाॅजिंग अ‍ॅण्ड रेस्टॉरंट आहे. नागरी वसाहतीतील या लाॅजिंगवर ४ ते ५ महिलांकडुन वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती डायल ११२ या पोलिसांच्या नंबरवर (Police Raid) मिळाली होती. या माहितीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी ठाण्याचे दुय्यम निरीक्षक गणेश ताठे यांच्यासह एक पथक तयार केले.

बनावट ग्राहकाला पाठवून टाकला छापा

त्यानंतर लाॅजिंगवर बनावट ग्राहकाला पाठवले. त्यानंतर लाॅजिंगवरील दलाल योगेश भोजू जाधव याने एक हजार रूपये घेत बनावट ग्राहकाला लाॅजिंगच्या रूममध्ये सोडले. दरम्यान पंटरने इशारा केला आणि पोलिसांनी छापा टाकला. यावेळी लाॅजिंगच्या विविध चार रूममध्ये चार वेश्या असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT