St Bus Women Driver: अखेर महिलेच्या हाती एसटी बसचे स्टेअरिंग; सिल्लोड मार्गावर चालिवली बस

अखेर महिलेच्या हाती एसटी बसचे स्टेअरिंग; सिल्लोड मार्गावर चालिवली बस
St Bus Women Driver
St Bus Women DriverSaam tv
Published On

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : एसटी महामंडळात महिला चालकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून गुरुवारी एका महिला चालकाने प्रवासी वाहतूक करत छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) ते सिल्लोड या मार्गावर (St Bus) यशस्वीरित्या सेवा बजावली. (Latest marathi News)

St Bus Women Driver
Buldhana News: चिखली तालुक्यात डेंग्यू सदृश्य तापाची साथ; भानखेडमध्ये गर्भवती महिलेसह 2 मुलांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर विभागातील या ऐतिहासिक घटनेची गुरुवारी नोंद झाली. विशेष म्हणजे चालक आणि वाहक पदाची जबाबदारी महिलांनीच पार पाडली. या महिला चालकांनी ३०० दिवसांचे उजळणी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एसटी महामंडळाच्या समितीने त्यांची टेस्ट घेतली. त्यात सर्व ५ महिला चालक उत्तीर्ण झाल्या. यानंतर ८० दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षणही त्यांना देण्यात आले. हे प्रशिक्षण ३ मे रोजी पूर्ण झाले. तर २२ मे रोजी अंतिम टेस्ट घेतल्यानंतर १ जून रोजी त्यांना रूजू करून घेण्यात आलेले आहे.

St Bus Women Driver
Coca Wildlife Sanctuary: कोका वन्यजीव अभयारण्यात २०८ वन्यजीवांची नोंद; वन्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण

चालक व वाहक महिलाच

एसटी महामंडळात कार्यालयीन पदांवर तसेच वाहक म्हणूनही महिला आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आहेत. यानंतर महामंडळाने चालक पदावरही महिलांना नियुक्त्या देण्यासाठी भरती केलेली आहे. विभागातील (MSRTC) पाच महिलांची चालक पदासाठी निवड झालेली आहे. चालक रमा गायकवाड व वाहक रोहिणी खेडकर यांची ड्युटी छत्रपती संभाजीनगर-सिल्लोड या मार्गावर देण्यात आली. रमा गायकवाड याना पहिला मान मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com