संजय जाधव, साम टीव्ही
Buldhana Chikhali Taluka News: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात डेंग्यू सदृश्य तापाची साथ पसरली आहे. भानखेड आणि सवना गावात अनेक रुग्ण तापाने फणफणत आहेत. तापामुळे आतापर्यंत दोन मुलांसह एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने भानखेड गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Latest Marathi News)
डेंग्यू सदृश्य तापामुळे आतापर्यंत तीन जणांचा जीव गेल्याने आरोग्य प्रशासन कधी जागे होणार? गावकऱ्यांना या आजारापासून कधी मुक्तता मिळणार?, असा प्रश्न भानखेड (Buldhana News) आणि सवणा ग्रामस्थ करत आहेत.
चिखली शहराला (Chikhali News) लागूनच असलेल्या भानखेड येथे गेल्या तीन आठवड्यापासून डेंग्यू सदृश्य तापाची लागण लहान मुले तसेच वयस्कर व्यक्तींना झाली आहे. आतापर्यंत रुग्णाचा आकडा ५० पर्यंत गेल्याची माहिती आहे. यातील काही रुग्ण बरे झाले आहेत.
अद्यापही २५ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, उपचार सुरू असताना गुरूवारी (१५ जून) कांचन तारु या २३ वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठवड्यातही दोन लहान मुलांचा अशाच तापाने मृत्यू झाला होता.
आता गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावं, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.