Coca Wildlife Sanctuary: कोका वन्यजीव अभयारण्यात २०८ वन्यजीवांची नोंद; वन्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण

Bhandara News: कोका वन्यजीव अभयारण्याची निर्मिती २०१३ मध्ये झाली.
Coca Wildlife Sanctuary
Coca Wildlife SanctuarySaam Tv
Published On

शुभम देशमुख

Bhandara News Today: कोका अभयारण्यात प्राण्याची प्रगणना करण्यात आली. १७ मचानी व २९ प्रगणकांच्या माध्यमातून झालेल्या प्रगणनेत विविध प्रजातींच्या २०८ वन्यजीवांची नोंद करण्यात आली. यामुळे वन्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.  (Latest Marathi News)

Coca Wildlife Sanctuary
Ravikant Tupkar News: रविकांत तुपकरांवर फुलांचा वर्षाव; पिकविमा व नुकसान मिळवून दिल्याबद्दल शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त सत्कार

कोका वन्यजीव अभयारण्याची निर्मिती २०१३ मध्ये झाली. सुमारे ९२.३४ चौरस किमी क्षेत्रावर हे अभयारण्य असून भंडारा शहरापासून पूर्वेला केवळ २० किमी अंतरावर आहे. या अभयारण्याला लागून न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती सुद्धा २०१३ मध्ये करण्यात आली.

दरवर्षी कोका वन्यजीव अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला वन्यजीवांची प्रगणा करण्यात येते. परंतु यावर्षी प्रगणना दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने प्रगणना रद्द करण्यात आली होती. नुकतीच अभयारण्य प्रशासनाचे वतीने प्रगणना आटोपण्यात आली. (Bhandara News)

Coca Wildlife Sanctuary
Bangladeshi Arrest in Mumbai : अवैधरित्या मुंबईत राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकाला अटक, मालवणी पोलिसांची कारवाई

प्रगणनेसाठी पाणवठ्यांशेजारी १७ मचान उभारण्यात आल्या. २९ प्रगणकांनी मोहिमेत सहभाग घेतला. प्रगणनेत बिबट, अस्वल, गवा, रानडुक्कर, चितळ, निलगाय, मुंगूस, सांबर, मोर, रानकोंबडी, वानर, सायाळ, भेंडकी आदी प्रजातींच्या २०८ प्राण्यांची नोंद करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com