pass mandatory to citizen entering ghati hospital sambhajinagar  saam tv
महाराष्ट्र

Ghati Hospital : घाटी रुग्णालयात निघालात? थांबा! वाचा नवीन नियम

घाटी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांची माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत असते. घाटी प्रशासनाने पुन्हा एकदा पास देण्याची यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात (ghati hospital) रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना पास देण्यात येणार आहेत. हे पास दाखविल्यानंतरच त्यांना रुग्णालयात प्रवेश मिळणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घाटी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांची माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत असते. ही गर्दी कमी करण्यासाठी घाटी प्रशासनाने पुन्हा एकदा पास देण्याची यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (मंगळवार) रुग्णांच्या नातेवाईकांना घाटी रुग्णालयात पास देण्यात येणार आहेत.

हा पास दाखविल्यानंतरच नातेवाईकांना रुग्णालयात प्रवेश दिला जाणार आहे. सामान्य रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांना निळ्या रंगाचा पास तर गंभीर रुग्णांसाठी लाल रंगाचे दोन पास दिले जातील. (Maharashtra News)

दरम्यान रुग्णालयातील सर्वच वार्डात रोज दीड हजाराहून अधिक रुग्ण दाखल असतात. या रुग्णांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक नेहमीच गर्दी करतात. यामुळे रुग्णावर उपचार करण्यात अडचण येत असल्याने घाटी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती साम टीव्हीला दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sudden cardiac death: अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू का होतो? कधीच समजून येत नाहीत पण संकेत देणारी कारणं

BJP Leader Killed : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Yavatmal Politics: ठाकरे गटाच्या 13 पदाधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी; काय आहे प्रकरण?

Pune Honeytrap: PMPML मधील कंडक्टर महिलेचा प्रताप, तिघांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं, आता स्वतःच अडकली

टॉयलेटमध्ये तासनतास फोन घेऊन बसल्याने होऊ शकतात 'या' आरोग्याच्या समस्या

SCROLL FOR NEXT