छत्रपती संभाजीनगर : अवैध पद्धतीने गॅस सिलेंडरचा वापर केला जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. प्रामुख्याने घरगुती गॅस सिलेंडरमधून गाड्यांमध्ये गॅस भरण्याचा प्रकार केला जात असतो. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी भागात गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधूनच सिलेंडरमध्ये गॅस रिफिलिंग केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार आमदार प्रशांत बंब यांनी उघडकीस आणला आहे.
गॅस सिलेंडरचा काळा बाजार हा ठिकठिकाणी सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या कार व रिक्षांमध्ये भरला जात असतो. यासाठी छुपी अशी सेंटर उभारण्यात आली आहेत. या विरोधात अनेकदा कारवाया झाल्या असताना हे प्रकार थांबलेले नाहीत. अशात आता घरगुती वापरातील एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधूनच गॅस रिफिलिंग करण्यात येत असल्याचे वाळूज परिसरात समोर आले आहे.
घरगुती वापराचा एलपीजी वाहून नेणाऱ्या महाकाय टँकरमधून गॅस अवैधरीत्या व्यावसायिक सिलेंडर मध्ये गॅस भरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाळूज औद्योगिक परिसराला लागून असलेल्या गंगापूर परिसरात हा प्रकार सुरू होता. बाजारभावापेक्षा व्यावसायिक सिलेंडर कमी किमतीत विकले जात होते का? गॅस टँकर इथपर्यंत कसा पोहचला? टँकर चालक गॅसची चोरी नेमक्या कसा करत होता, यासह अन्य प्रश्न उपस्थित होतात.
अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा कोणाचा?
या सगळ्या प्रकारचे चित्रीकरणही करण्यात आले आहे. घटनास्थळी शेकडो गॅस सिलिंडरचे गोदाम असून तेथे सुरक्षेची कुठलीही उपाययोजना नव्हती. काही मोठी दुर्घटना घडून अनेकांच्या जिवाला धोका होऊ शकतो. मात्र, हा अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा नेमका कोण चालवते? याचा शोध सुरू असून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.