Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain : चार दिवसांच्या अतिवृष्टीने सर्वच हिरावले; पिकांसोबत शेतीही गेली वाहून, शेतकऱ्याला अश्रू अनावर

Sambhajinagar News : राज्यात सर्वदूर जोरदार पावसाने झोडपून काढले असून मराठवाड्यात अधिक पाऊस झाला आहे. यात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून संभाजीनगर जिल्ह्यात अधिक नुकसान झाले

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सलग चार दिवस अतिवृष्टी झाल्याने हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड, पैठण तालुक्यात अनेक शिवारामध्ये पीक वाहून तर गेले आहेच; सोबत शेतही वाहून गेल्याचे चित्र समोर आलं आहे. याच सिल्लोड तालुक्यातील धावडा परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांची शेतीच वाहून गेली. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धावडा गावातील अल्पभूधारक शेतकरी गणेश बनकर याची मुसळधार पावसाने अर्धी शेती वाहून गेली आहे. तर उर्वरित पीक जमीनदोस्त झाले आहे. गणेश बनकर यांची अडीच एकर शेती असून या शेतात एक एकर चवळी आणि दीड एकर कोबीची लागवड केली होती. मात्र अतिवृष्टीमुळे आणि महापुरामुळे होत्याचं नव्हतं झालं.

कोबी, चवळीचे पीक गेले वाहून

महापुराच्या पाण्यातून एक एकर कोबी व अर्धा एकर चवळी पूर्णपणे वाहून गेली. इतकेच नव्हे तर शेतजमिनीवरील सुपीक मातीही वाहून गेल्याने शेतजमीन खरडून पडली आहे. यामुळे पुढील काळात शेती करणेही कठीण झाले आहे. एका रात्रीत हिरवळलेली बागायती जमीन उघडी व वाळवंटी झाली. हा प्रसंग त्या शेतकऱ्यासाठी केवळ पिकांचे नुकसान नसून आयुष्यभराची पेरलेली आशा हिरावून नेणारा ठरला आहे. 

कुटुंबाची मोठी अडचण 

रात्रंदिवस अख्या कुटुंबांने मेहनत करून ही शेती पिकवली. पण डोळ्यासमोरच ती वाहून गेली. मग खायचं काय असा प्रश्न निर्माण झाला. शेती वाहून जाण्यासोबत शेतीतलं पीक वाहून गेलं. सोबतच कर्ज काढून घेतलेले ड्रिपही वाहून गेले. आता या शेतीतून पिकवायचं तर सोडून द्या, ती सुस्थितीत आणण्यासाठी मोठा खर्च लागणार आहे. आता तो खर्च कुठून आणायचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भविष्यात कसा करायचा? अशी चिंता या कुटुंबाला आहे. त्यामुळे आता या कुटुंबाला मदतीच्या हाताची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात 20 टक्क्यांनी वाढ

Self Help Allowance : बेरोजगारांना महिन्याला मिळणार १००० रुपये; निवडणुकीच्या तोंडावर नितीश सरकारची मोठी घोषणा

OBC Reservation: ''आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळ यांचा शरद पवारांना सवाल

Dudhi Halwa Recipe : नवरात्रीचा प्रसाद होईल स्पेशल, झटपट बनवा दुधीचा चविष्ट हलवा

Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, एका तासात रस्त्यांची झाली नदी; पुणेकरांचे प्रचंड हाल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT