मयुरेश कडव
बदलापूर : बदलापुरात एका नशेबाज गावगुंडाने आपल्या साथीदारांच्या मदतीने पोळी भाजी केंद्राची तोडफोड केली आहे. इतकेच नाही तर केंद्राच्या मालकाला धमकावल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. हा संपूर्ण तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकरणी बदलापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बदलापूरच्या कात्रप नाका, स्वामी समर्थ चौकातल्या दत्तप्रबोध इमारतीत विजय सूर्यवंशी यांचे त्रिमूर्ती पोळी भाजी केंद्र आहे. या ठिकाणी व्यावसायिक गाळेधारकांच्या शौचालयाजवळ अक्षय कुडतळकर आणि त्याचे साथीदार हे नेहमीच नशा करत असतात. विजय सूर्यवंशी यांनी तू इथे नशा करत जाऊ नकोस या ठिकाणाहून रहिवासी तसेच महिला ये जा करत असतात असे सांगितले. याचा अक्षयला राग आला.
जीवे मारण्याची धमकी
राग मनात धरून अक्षय याने विजय सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता त्यांने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने त्यांच्या पोळी भाजी केंद्राची तोडफोडही केली. यावेळी केंद्रावर काम करणाऱ्या कामगारांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील मारहाण केली. यामुळे झालेल्या झटापटीत पोळी भाजी केंद्रातील एक कामगार जखमी झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय कुडतळकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, तो नेहमीच इथल्या रहिवाशांना त्रास देत असतो. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी इथल्या रहिवाशांमधून केली जात आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.