रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे साथ रोगांचा चांगलाच ताप वाढला आहे. एकाच वेळी डेंग्यू, कोरोना आणि स्वाइन फ्लू या आजाराने डोके वर काढल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. सद्यस्थितीत छत्रपती संभाजी नगर शहरात कोरोनाचे १३ रुग्ण सक्रिय असून ते होम आयसोलेशनमध्ये आहे. तर स्वाइन फ्लूचे एकूण १२ रुग्णांचे निदान झाल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.
बदलते वातावरण आणि सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे (Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर शहरात (dengue) डेंगू, सर्दी, ताप यासारख्या साथीच्या आजारात वाढ होत चालली आहे. संभाजीनगर शहरातील २५ वार्ड हे डेंजर झोनमध्ये आहे. सद्यस्थितीला शहरात रोज १ हजार डेंग्यू सदृश्य तर १० हजार रुग्ण हे हिवतापाचे आढळून येत आहे. यासोबतच कोरोनाचे (Corona) देखील रुग्ण आढळून येत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मोहीम केवळ कागदावरच
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वीच हिवताप आणि डेंगूला रोखण्यासाठी अबेट, औषध फवारणी आणि डासाच्या उत्पत्ती स्थानावर विविध मोहिमा राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु महापालिकेने या मोहिमा केवळ कागदावरच राबवल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यामध्ये डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान शहरवासीयांकडून औषध फवारणी आणि फोगिंग करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.