छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी एमआयडीसी वाळुज परिसरात परवानगी नसलेला गुटखा, पान मसाला आणि सुंगधित तंबाखु वाहतुक करणारा टेम्पो पकडला आहे. या ट्रकमध्ये तब्बल ७२ लाख रुपयाचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू आढळून आली आहे. सदरचा ट्रक संभाजीनगर पोलिसांनी जप्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी वाळूज परिसरात पकडण्यात आलेला गुटख्याचा हा ट्रक धुळे- सोलापुर हायवेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचुन कारवाई केली. ट्रकची तपासणी केली असता यात ६० लाख ६६० रुपये किमतीचा बाजिरिओ फ्लेवर्ड हा सुंगधित पान मसाला आणि १२ लाख १३२ रुपये किमतीचा मस्तानी तंबाखू असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला आढळून आला.
तीन जणांना घेतले ताब्यात
याशिवाय २२ लाख किमतीचे दोन वाहने आणि १५ हजार किंमतीचे तीन मोबाईल हॅन्टसेट असा एकुण ९४ लाख १५ हजार ७९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर मोहम्मद शफिर मोहम्मद सादिक, ताहेर खान सईद खान, अनिस रफिक शेख या तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे येथे गुन्हा दखल करण्यात आला आहे.
नागपूर पोलीसानी रोलर फिरवत दारू केली नष्ट
नागपूर : नागपुर पोलिसांनी विविध कारवाईमध्ये जप्त केलेली सुमारे ६० लाखाची दारू रोलर चालवून नष्ट करण्यात आली. पोलीस स्थापना आठवडा अनुषंगाने दारू नष्ट करण्याची मोहीम राबवण्यात आली. यात पारडी पोलीस स्टेशन समोरील मैदानात जप्त दारूच्या देशी- विदेशी बाटल्यांवर रोड रोलर फिरवण्यात आला. यात तब्बल २० हजार ८५० बाटल्या दारू नष्ट करण्यात आल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.