५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या
७ लाख हुंडा मागणी व अमानुष छळाचा नातेवाइकांचा आरोप
पतीच्या दुसऱ्या लग्नाच्या धक्क्याने विश्वासभंग
पती, सासू, दीरावर IPC 306 अंतर्गत गुन्हा; पोलिस तपास सुरू.
माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पाच महिन्याच्या गरोदर महिलेने आपल्या आयुष्याचा दोर कापला आहे. पतीने महिलेची फसवणूक करून दुसरं लग्न केल्याच्या कारणातून या महिलेने आत्महत्या केली असल्याचं उघडं झालं आहे. मृत महिलेचं नाव आयशा अरबाज शेख असे आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सात लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आयशाचा अमानुष छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप तिच्या नातेवाइकांनी केला. शिवाय आयशाच्या नवऱ्याने तिला अंधारात ठेवतं दुसरं लग्न केलं. या घटनेने हताश झालेल्या आयशाने टोकाचं पाऊल उचलले असल्याचं देखील तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.
आत्महत्येपूर्वी आयशाने सुसाइड नोट लिहली असून सुसाईड नोटमध्ये तिने तिचे दुःख मांडले आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात पती व सासरच्या मंडळींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अरबाज सलीम शेख, सासू सायरा सलीम शेख आणि अलीम सलीम शेख अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
आयशाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ती म्हणाली की, "मी खूप त्रासले आहे. अरबाज आणि त्याच्या घरचे मला खूप त्रास देत आहेत. मी पण एक माणूस आहे. माझंही एक जीवन आहे. माझ्याही इच्छा आहेत. पण आता माझा नवरा माझ्या आयुष्यात नाही. आता फक्त मुलंच माझ्या आयुष्यात आहेत. त्यांनाच मला बघायचं आहे. आय हेट माय लाईफ. आता माझ्या हृदयात कुणीही नाहीये ना कुणाच्या हृदयात मी."
पुढे ती म्हणाली की, "जर कुणाला मला मनात ठेवायचं असेल तर मनापासून ठेवा, केवळ मन राखण्यासाठी कुणाला हृदयात ठेवू नका. मी लग्न करून फसली आहे. मी लग्न का केलं? माझी चांगली आनंदी लाईफ होती. पण आता बघा... मला त्याच्यात काहीच इंटरेस्ट राहिलेला नाही, कारण माझा नवरा माझ्यावर प्रेम करत नाही. आता मी केवळ माझ्या मुलांसाठी जगत आहे. असं नाही की मी प्रेम नाही केलं, खूप जास्त केलं, पण त्याबदल्यात मला फक्त दु:ख मिळालं. मी कुणाला काही बोलूही शकत नाही. आता माझा विश्वास तुटला आहे. तो सारखा सोनी सोनी सोनी करत राहतो. पण सोनीचं नाव ऐकून माझं डोकं खराब होतं. जाऊ द्या आता काय बोलायचं", असंही तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. दरम्यान या घटनेने संभाजीनगर हादरले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.