Harshvardhan Patil : सांगलीच्या राजकारणात आणखी एक पाटील, माजी मुख्यमंत्र्यांचा पणतू निवडणुकीच्या रिंगणात

Sangli Great-Grandson of Vasantdada Patil Harshvardhan Patil : वसंतदादा पाटील यांचे पणतू व विशाल पाटलांचे पुतणे हर्षवर्धन पाटलांची राजकारणात एंट्री. सांगली महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Harshvardhan Patil : सांगलीच्या राजकारणात आणखी एक पाटील, माजी मुख्यमंत्र्यांचा पणतू निवडणुकीच्या रिंगणात
Sangli Great-Grandson of Vasantdada Patil Harshvardhan PatilSaam Tv
Published On
Summary
  • माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू हर्षवर्धन पाटलांची राजकारणात एंट्री

  • वसंतदादा घराण्यातून प्रथमच युवा नेतृत्व महापालिका निवडणुकीत

  • MIT पुणे आणि इंग्लंड MS शिक्षणानंतर राजकारणात पदार्पण

  • प्रभाग 11 मधील संजय नगरसह परिसरात मजबूत जनसंपर्क

  • मनोज सरगर पक्षांतरामुळे प्रभागात काँग्रेस-भाजप अटीतटीची लढत शक्य

विजय पाटील, सांगली

सांगलीच्या राजकारणात आता माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री यांचे सुपुत्र व खासदार विशाल पाटलांचे पुतणे हर्षवर्धन पाटलांची एंट्री झाली आहे. हर्षवर्धन पाटील हे आता सांगली महापालिका निवडणूक लढवणार आहेत. हर्षवर्धन पाटील हे प्रतीक पाटील यांचे मोठे चिरंजीव आहेत. पुणे एमआयटी मधून शिक्षण घेत थेट इंग्लंड मधून एमएस शिक्षण पूर्ण करून हर्षवर्धन पाटील आता थेट सांगलीच्या राजकीय आखाड्यात उतरले आहेत.

राजकारणाचे बाळकडू हे घरातच असल्याने हर्षवर्धन पाटील गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या समाजकार्यात सक्रिय आहेत.आणि साखर कारखाना परिसर असणारया प्रभाग क्रमांक 11 मधून हर्षवर्धन पाटलांनी आपले दावेदारी केली आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून हर्षवर्धन पाटील यांनी प्रभाग 11 मधला संजय नगरसह आसपासचा परिसर पिंजून काढला आहे.

Harshvardhan Patil : सांगलीच्या राजकारणात आणखी एक पाटील, माजी मुख्यमंत्र्यांचा पणतू निवडणुकीच्या रिंगणात
Shocking : "मराठी सोडून हिंदीत बोलते..." ६ वर्षांच्या लेकीची निर्घृण हत्या; निर्दयी आईनेच रचला कट

विशेष म्हणजे वसंतदादा घराण्यातील मदन पाटलांच्या नंतर महापालिकेची निवडणूक लढवणारे हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील हे दुसरे व्यक्ती असतील जे थेट महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वास्तविक वसंतदादा घराण्यामध्ये आमदारकी, खासदारकी निवडणुका लढवण्याचा आजपर्यंतचा इतिहास राहिला आहे. मात्र थेट महापालिका निवडणुकीने हर्षवर्धन पाटलांच्या रूपाने वसंतदादा घराणं जनतेला सामोरं जाणार आहेत.

Harshvardhan Patil : सांगलीच्या राजकारणात आणखी एक पाटील, माजी मुख्यमंत्र्यांचा पणतू निवडणुकीच्या रिंगणात
Badlapur : बसचा सिनेस्टाईल पाठलाग केला, पुलावर गाठलं, कुऱ्हाड घेऊन बस चालकावर हल्ला; बदलापूरमधील धक्कादायक घटना|VIDEO

प्रभाग 11 मध्ये एकेकाळी विशाल पाटलांचे कट्टर कार्यकर्ते आणि समर्थक असणारे मनोज सरगर यांनी भाजपाची वाट धरली आहे, यामुळे प्रभागात काँग्रेस थोडीशी बॅकफुट वर गेली आहे. त्यामुळे मनोज सरगरांच्या विरोधात विशाल पाटलांनी पुतण्या हर्षवर्धन पाटलांना मैदानात उतरवण्याचं रणनीती आखल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रभाग 11 मध्ये काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळाल्यास निवडणूक रंगतदार व अत्यंत अटीतटीची लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com