Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : २४०० शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिकवेळा अनुदान; संभाजीनगर जिल्ह्यात महसूल विभागाचा भोंगळ कारभार उघड

Sambhajinagar News : अतिवृष्टी, वादळी वारा, अवकाळी पाऊस तसेच पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाईपोटी अनुदान मंजूर करण्यात आले

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : निसर्गाच्या लहरीपणात शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले होते. याची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान जाहीर करण्यात आले होते. दरम्यान राज्यातील अनेक भागात शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. तर दुसरीकडे संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना एकपेक्षा अधिक वेळा अनुदान मिळाल्याचा धक्कादायक प्रकार लेखा परीक्षणानंतर समोर आला आहे. 

अतिवृष्टी, वादळी वारा, अवकाळी पाऊस तसेच पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत असते. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाईपोटी अनुदान मंजूर करण्यात आले होते. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना वर्ष, दोन वर्ष होऊन देखील अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. तर संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिकवेळा अनुदानाचा लाभ मिळाला आहे. तर खुलताबाद तालुक्यात एकाही शेतकऱ्याला अधिकचे अनुदान मिळालेले नाही. 

त्या शेतकऱ्यांकडून वसुलीस सुरवात 

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत २०२२- २३ मध्ये महसूल विभागाच्यावतीने जिल्ह्यातील २ हजार ३९९ शेतकऱ्यांना एक पेक्षा अधिक वेळा अनुदान देण्यात आले आहे. आता प्रशासनाकडून याची वसुली सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ४६४ शेतकऱ्यांनी ३९ लाख २७ हजार ८३१ रुपये शासनाकडे जमा केले आहेत. तर १ हजार ९३१ शेतकऱ्यांना वारंवार नोटीस देउनही अनुदान परतीकडे दुर्लक्ष केले आहे. 

तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिकचे पैसे गेले आहेत, त्या बँकांना महसूल विभागाकडून पत्र देण्यात आले आहे. दरम्यान संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात ६१६ शेतकऱ्यांपैकी ३१२ शेतकऱ्यांनी २४ लाख २० हजार ७६२ रुपये शासनाकडे जमा केले. गंगापूर तालुक्यात सात पैकी तीन शेतकऱ्यांनी १७ हजार ८५० रुपये जमा केले. फुलंब्री तालुक्यात २० पैकी १४ शेतकऱ्यांनी ८३ हजार ४८७ रुपये परत केले. सिल्लोड तालुक्यात ६१० पैकी १३५ शेतकऱ्यांनी १४ लाख ५७ हजार ६१६ रुपये जमा, सोयगाव तालुक्यात ५३ पैकी ४ शेतकऱ्यांनी दहा हजार ३३६ रुपये परत केले. वैजापूर तालुक्यात ७९० आणि संभाजीनगर तालुक्यात २८५ पैकी एकानेही पैसे परत केलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

SCROLL FOR NEXT