Corona Update : वसई- विरारकरांची चिंता वाढली; कोरोनाचे नवे आठ रुग्ण

Vasai Virar News : मागील काही दिवसांपासून देशात व राज्यात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात नव्याने आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली आहे
Corona Update
Corona UpdateSaam tv
Published On

मनोज तांबे

विरार : राज्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान वसई, विरार शहरात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला असून शहरात आतापर्यंत एकूण ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांवर पालिकेच्या जीवदानी रुग्णालय उपचार सुरु आहेत. तर रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. 

मागील काही दिवसांपासून देशात व राज्यात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात नव्याने आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली आहे. दरम्यान राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर, कल्याण यानंतर वसई- विरारमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यात झपाट्याने वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. 

Corona Update
Nanded : रिल्स बनवून व्हायरल करणे आले अंगलट; तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

वसई विरारमध्ये रुग्ण 

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आहे. दरम्यान कल्याणमध्ये कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना मागील आठवड्यात घडली आहे. यानंतर वसई विरारमध्ये कोरोनाचे नवे ८ रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. या रुग्णांची प्रकृती चांगली असून महापालिकेच्या जीवदानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र हे रुग्ण असलेल्या भागात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. 

Corona Update
Kalyan MNS : वाढीव कचरा शुल्क प्रकरणी मनसे आक्रमक; केडीएमसी मुख्यालयावर जन आक्रोश मोर्चा

९ हजार नागरिकांच्या चाचण्या 

कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या करण्यास पालिकेच्या वैद्यकीय विभागाने सुरुवात केली आहे. यामध्ये एकूण ९ हजाराहून अधिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तर नागरिकांनी वर्दळीच्या ठिकाणी मास्क घालावा, घरी गेल्यावर हात स्वच्छ पाण्याने धुवावे तसेच पालिकेने दिलेल्या निर्देशांचे पालन करून पालिकेला सहकार्य करावे; असे आवाहन पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com