Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : संभाजीनगरात ११३ रिक्षा जप्त; बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

Sambhajinagar News : एका महिला प्रवासीला गल्लीबोळातून फिरवत नेण्याचा प्रकार एका रिक्षा चालकांकडून करण्यात आला होता. यानंतर सदर महिलेने रिक्षा चालकांना मारहाण देखील केली

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी आता वाहतूक शाखेचे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. दरम्यान वाहतूक पोलिसांनी ४८० रिक्षांची तपासणी करून त्यापैकी ११३ रिक्षा जप्त करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. 

संभाजीनगर (Sambhajinagar) रिक्षा चालकांकडून बेशिस्तपणा सुरु आहे. वाहतूक पोलिसांनी अनेकदा कारवाई केल्यानंतर देखील रिक्षा चालकांची अनेकदा मनमानी सुरु असल्याचे पाहण्यास मिळते. दरम्यान बुधवारी एका महिला प्रवासीला गल्लीबोळातून फिरवत नेण्याचा प्रकार एका रिक्षा चालकांकडून करण्यात आला होता. यानंतर सदर महिलेने रिक्षा चालकांना मारहाण देखील केली होती. या घडलेल्या प्रकरणानंतर (Traffic Police) वाहतूक पोलीस खळबळून जागे झाले असून त्यांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. 

विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकीत नियम लावून प्रवाशांसोबत चांगली वागणूक ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र काल एका महिलेला रिक्षा चालकाने जाणून गल्लीबोळातून घेउन जाण्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यानंतर वाहतूक शाखेने ही कारवाई करण्यास सुरुवात केली. यात दिवसभरात ४८० रिक्षांची तपासणी करत ११३ रिक्षा जप्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT