Cyber crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber crime : घरबसल्या लाखो जिंकण्याचे आमिष; २२ दिवसात महिलेकडून उकळले २५ लाख

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करण्याचे काम केले जात असते. प्रामुख्याने जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष देत लाखो रुपये गंडविल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असाच एक प्रकार संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. यात घरबसल्या पैसे कमविण्याचे आमिष देत महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. 

संभाजीनगर (sambhajinagar) शहरात वास्तव्यास असलेल्या एका महिलेला सायबर गुन्हेगाराने संपर्क साधला. यानंतर त्याने महिलेला टेलिग्रामवर घरबसल्या हजारो रुपये कमवण्याची संधी असल्याचे सांगितले. यामध्ये त्याने महिलेकडून थाप मारून वेळोवेळी पैशांची मागणी केली. यात त्याने गृहिणीकडून (Cyber crime) मागील २२ दिवसांमध्ये तब्बल २५ लाख ७२ हजार ९७८ रुपये उकळले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

फसवणूक झालेल्या महिलेने समोरच्या व्यक्तीकडे पैशांची मागणी केली. मात्र त्याने टाळाटाळ केल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. या प्रकरणी गृहिणीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मोठी बातमी! सहकारी संस्था निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली

Diabetes risk : समोसा,भजी, वेफर्स खाताय? सावधान; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Black Rose: काळा गुलाब कोणत्या देशात आढळतो?

VIDEO : रत्नागिरीत मंत्री उदय सामंतांना दाखवले काळे झेंडे; पाहा काय आहे प्रकरण

National Animal: भारताचा वाघ, तर पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी कोणता? पाहून हसायलाच येईल

SCROLL FOR NEXT