छत्रपती संभाजीनगर : शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकरी कुटुंबाच्या घरावर दरोडेखोरांनी रात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला आहे. यामध्ये दोन्ही शेतकरी कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण करत सोने- चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम या दरोडेखोरांनी लांबविली. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या टोकी शेतवस्तीवर हा घटना घडली आहे. टोळी वस्तीवर राहणाऱ्या भीमराव शेजवळ आणि कारभारी शेजवळ या शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास आठ ते दहा दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश करत धुमाकूळ घातला आहे.
मारहाण करत ऐवज लांबविला
आठ ते दहा दरोडेखोरांनी घरांमध्ये प्रवेश करत शेतकरी कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. यानंतर घरात असलेले सोन्याचे दागिने, रोख रकमेसह ५ लाख ४७ हजार रुपयाचा ऐवज लुटून पसार झाले. या घटनेत मारहाण झाल्याने शेतकरी कुटुंब जखमी झाले आहे. तसेच भयभीत कुटुंबीयांनी पोलिसात जात घडल्या प्रकारची तक्रार दिली आहे. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली.
सात जणांना घेतले ताब्यात
घटनेचा एमआयडीसी वाळूज पोलीस आणि गुन्हे शाखा तपास करीत श्वान पथकाच्या मदतीने मदतीने दरोडेखोरांच्या मुस्क्या आवळण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे. श्वान पथकाने घटनास्थळापासून तब्बल सात ते आठ किलोमीटर अंतर कापून दरोडा टाकणाऱ्या सात आरोपींना पकडून बेड्या ठोकल्या. आरोपींवर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.