मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग व शासकीय यंत्रणेकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व य कर्मचाऱ्यांना मतदान सक्तीचे पत्र काढले आहे. (Maharashtra News)
'मतदानाच्या दिवशी (१३ मे) सर्व कर्मचाऱ्यांच्या बोटाला शाई लावलेली आहे की नाही ते तपासा. ज्यांच्या बोटाला शाई नसेल त्यांच्या नावाची यादी १६ मेपर्यंत पाठवा,' असा लेखी आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील प्रमुखांना पाठला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांत २०१९ च्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले. अनेक सरकारी कर्मचारी-अधिकारी इलेक्शन ड्यूटीवर आहेत. त्यामुळे त्यांचे पोस्टल मतदान प्रशिक्षणादरम्यान झालेच आहे. यापैकी ज्यांनी मतदान केलेले नाही त्यांच्यासाठी व इलेक्शन ड्यूटीवर नसणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मतदान करावे, अशी सक्ती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
स्वामी यांनी ७ मे रोजी जिल्ह्यातील ४६० कार्यालयांतील प्रमुखांना एक पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, '१३ मे रोजी जालना आणि औरंगाबादेत मतदान होईल. ११, १२ मे रोजी शनिवार- रविवारची सुटी आहे. १३ मे रोजी मतदानासाठी सुटी आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तरी आपल्या कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी १३ मे रोजी मुख्यालयी हजर राहावे. त्यांनी मतदान करण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच १४ मे रोजी हे कर्मचारी- अधिकारी कार्यालयात आल्यावर त्यांच्या बोटाची शाई तपासून मतदान केल्याची खातरजमा करावी. तसेच ज्यांनी मतदान केले नसेल त्यांच्या नावांची यादी १६ मे रोजी जिल्हाधिकारी पाठवावी असेही नमूद केले आहे.
कल्याण डोंबिवलीत मतदान जनजागृतीसाठी बाईक रॅली
लोकसभा निवडणुकीचे 20 तारखेला मतदान आहे मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोग व महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातायत. आज (शुक्रवार) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून मतदान जनजागृतीसाठी बाईक रॅली काढण्यात आली. कल्याण पश्चिमेकडून दुर्गाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते कल्याण पूर्वेकडील ड प्रभाग कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली.
या बाईक रॅलीमध्ये महापालिका आयुक्त इंदू राणी जाखड यांच्यासह पालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अग्निशमन विभागाचे अधिकारी,कर्मचारी देखील सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांना मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.