सरकारच्या 'जीआर'वर औरंगाबादच्या अगोदर संभाजीनगर ! Saam Tv News
महाराष्ट्र

सरकारच्या 'जीआर'वर औरंगाबादच्या अगोदर संभाजीनगर !

सरकारी पातळीवर अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. मात्र, आता राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या जीआर म्हणजेच शासन आदेशावर संभाजीनगरचा उल्लेख केला गेला आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: राज्यात औरंगाबाद की संभाजीनगर यावरून गेल्या तीस वर्षांपासून औरंगाबादचं राजकारण केंद्रित आहे. शिवसेनेच्या (Shivsena) वतीने संभाजीनगरची हाक दिल्यानंतर पण सत्तेत आल्यानंतर संभाजीनगर नामकरण करणार असं आश्वासन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचेही दिसून आले. दुसरीकडे सरकारी पातळीवर अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. मात्र, आता राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या जीआर म्हणजेच शासन आदेशावर (Government Resolution) संभाजीनगरचा उल्लेख केला गेला आहे. (Sambhajinagar before Aurangabad on government's GR!)

हे देखील पहा -

औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यासाठी शासन स्तरावरही औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रस्ताव पाठवून हालचाली केल्या होत्या. मात्र आता थेट शासनाच्या 'जीआर'वरच संभाजीनगरचा उल्लेख करण्यात आलाय. राज्य शासनाने राज्य जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदमध्ये उद्योजक राम भोगले यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड केली आहे, त्याचा जीआर सरकारने काढला आहे. त्या जीआरमध्ये राम भोगले यांच्या नावासमोर संभाजीनगर आणि नंतर औरंगाबाद असा उल्लेख केला आहे. त्यामुळे कागदोपत्री संभाजीनगर असे नामकरण होतंय का? या चर्चेला पुन्हा सुरुवात झालीये.

राज्य शासन निर्णयाद्वारे राज्याचे नविन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले आहे. राज्यामध्ये परकीय व देशांतर्गत गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषद (Global Investment Promotion Council) स्थापन करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये आवश्यकतेनुसार राज्यातील प्रमुख औद्योगिक संघटनांचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सल्लागार संस्था, देश-विदेशातील व्यक्ती अथवा नामांकित संस्थांचे प्रतिनीधी यांचा विशेष निमंत्रित म्हणून नियुक्त करण्यासंबंधी नमूद करण्यात आले आहे. त्यास अनुसरुन राज्यातील जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेमध्ये (Global Investment Promotion Council) उद्योग क्षेत्राशी संबंधित ५ सदस्यांना विशेष निमंत्रित म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्यात नितीन पोतदार, प्रशांत गिरबने, प्रसन्न सरंबळे (मुंबई), राम भोगले, औरंगाबाद आणि सुरेश राठी, नागपूर यांचा समावेश आहे. मात्र यातील राम भोगले यांच्या नावासमोर औरंगाबादच्या अगोदर संभाजीनगरचा उल्लेख करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT