Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : भरधाव ट्रकने ट्रॅक्टरसह चार दुचाकींना उडविले; दोघे गंभीर जखमी, विद्यार्थी थोडक्यात बचावले

Sambhajinagar News : ट्रॅकने रस्त्याच्या बाजूने जात असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. यानंतर त्या ट्रॅक्टरला ओढत स्कुटीसह तीन- चार दुचाकी फरफटत नेल्याचे दिसत आहे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : सिमेंटने भरलेल्या ट्रकने एका ट्रॅक्टरसह तीन ते चार दुचाकींना धडक देत ओढत नेल्याची घटना संभाजीनगर- जळगाव महामार्गांवर घडली आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून ट्रक चालकाला पाठलाग करून पकडण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar News) जळगाव महामार्गावरील फुलंब्री तालुक्यातील आळंदला हा अपघात घडला आहे. या अपघातात छत्रपती संभाजीनगरहुन सिल्लोडकडे जात असलेल्या सिमेंटच्या ट्रकने दुचाकींना उडविल्याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. सदर अपघातात ट्रकने रस्त्याच्या बाजूने जात असलेल्या ट्रॅक्टरला धडक (Accident) दिली. यानंतर त्या ट्रॅक्टरला ओढत स्कुटीसह तीन- चार दुचाकी फरफटत नेल्याचे दिसत आहे. 

युवकांनी दुचाकीवर ट्रकचा केला पाठलाग 

या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना घडल्यानंतर चालकाने ट्रक ना थांबविता तेथून सुसाट वेगाने ट्रक घेऊन गेला. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर ट्रक चालक आळंदला न थांबता भरधाव वेगाने पलायन केले. यावेळी ट्रकच्या दोन्ही बाजूने आळंदचे काही युवक लटकत व काही २५ ते ३० युवकांनी दुचाकीवर पाठलाग केला.  

विद्यार्थी थोडक्यात बचावले 

दरम्यान सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर येथील सिद्धेश्वर हायस्कुलच्या दोन्ही इमारतीमधून येथील सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या आवारात चालकाने ट्रक थांबविला. याठिकाणी देखील शाळेचे विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत. याठिकाणी पाठलाग करणाऱ्या युवकांनी ट्रक चालकाला पकडले. या दरम्यान सिल्लोड शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी ताफ्यासह वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. ट्रक वडोद बाजार पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT