Beed News : तुर उत्पादन वाढीसाठी बीडच्या शेतकऱ्याचा अनोखा फंडा; गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने घेणार उत्पादन

Beed News : झाडाची वाढ कमी होऊन आजूबाजूला फांद्या वाढल्या आहेत. परिणामी आता यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

बीड : पारंपरिक शेतीला फाटा देत बीडमधील शेतकरी आधुनिक शेतीच्या माध्यमातून विकसनशील शेती करत आहेत. अशातच बीडच्या आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील शेतकऱ्याने तुरीचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनोखा फंडा वापरला आहे. यामुळे तुरीच्या पिकाला बहर आला असून आता या शेतकऱ्याला एकरी तीन ते चार क्विंटल तुरीचे जास्तीचे उत्पन्न होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

बीडच्या (Beed News) आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील राजेंद्र धोंडे असं अनोखा फंडा करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. राजेंद्र धोंडे यांनी आपल्या एक हेक्टर शेतामध्ये तुरीची लागवड केली आहे. या दरम्यान त्यांनी या तुरीचे ४५ व ९० दिवसात शेंडे खुडले होते. यामुळे झाडाची वाढ कमी होऊन आजूबाजूला फांद्या वाढल्या आहेत. परिणामी आता (Farmer) यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Beed News
Crop Insurance : २३५ कोटी रुपयाचा पिक विमा मोबदला बाकी; पिकविम्यासाठी रविकांत तुपकरांची कृषी कार्यालयात धडक

यंदा दुपटीने वाढणार उत्पादन 
शेतकरी धोंडे यांना गतवर्षी १२ क्विंटल तूर झाली होती. मात्र यंदा त्यांनी विकसनशील पद्धतीने शेती केल्याने जवळपास २५  क्विंटल उत्पादन होणार आहे. यासाठी त्यांना आतापर्यंत २५ हजार रुपये खर्च आला असून जवळपास २ लाख रुपयांचे सरासरी उत्पन्न मिळू शकते; असा विश्वास व्यक्त करतांना शेतकरी राजेंद्र धोंडे यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला..

Beed News
Agriculture News : दाट धुक्यामुळे पिकांसह फळबागांवर रोगांचा प्रादुर्भाव; मका, ज्वारी वर अळीचा प्रादुर्भाव

शेंगांच्या भरघोस लागनने झाड वाकले 

तुरीच्या झाडाचे शेंडे खुडल्याने आजूबाजूच्या फांद्यांची अधिक वाढ झाली. शिवाय या फांद्यांना फुल बहार चांगला येऊन शेंगा देखील अधिक प्रमाणात लागल्या आहेत. आता शेंगांमध्ये दाणे पूर्णपणे भरले गेल्याने वजनामुळे तुरीचे झाड पूर्णपणे वाकून गेले आहे. यामुळे एकरी तीन क्विंटलने उत्पन्न वाढणार असा विश्वास शेतकऱ्याने व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com